जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी शंकर चहांदे यांची निवड जनतेचा हृदयात रामटेक लोकसभा उमेदवारीचा वारस शंकर चंहादे

जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी शंकर चहांदे यांची निवड

जनतेचा हृदयात रामटेक लोकसभा उमेदवारीचा वारस शंकर चंहादे

कन्हान,ता.१५ जुलै

     कन्हान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांची नागपूर जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा अरविंद गजभिये, डॉ.राजीव पोतदार यांचे चहांदे यांनी आभार मानले.

     उल्लेखनीय आहे की, शंकर चहांदे मागील अनेक वर्षापासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून मोलाची भूमिका बजावली. सर्वप्रथम त्यांनी १९९२ ला भाजपात एक कार्यकर्ता म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. कार्य करीत असताना त्यांना कन्हान शाखा भाजपाचे उपाध्यक्ष केले. त्यानंतर नागपूर जिल्हा दलीत आघाडी अध्यक्ष झाले. आता तेच भाजपा अनुसूचित जाती आघाडी ने ओळखल्या जाते. निरंतर पार्टीसाठी व तरुण युवा पिढीना जोडत कन्हान शहरात एक वेगळीच ओळख निर्माण केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची कार्यशैली बघता जिल्हा उपाध्यक्ष बनविले. त्यानंतर त्यांना भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर रामटेक विधानसभा प्रमुख म्हणून पार्टीची जवाबदारी देत त्यांना कन्हान जिल्हा परिषद सर्कल मधून पार्टीची तिकीट देत १९९७ ते २००७ पर्यंत निवडूण येऊन दोनदा सदस्य बनले.‌ तसेच नागपूर जिल्हा परिषद चे सभापती सुध्दा बनत मोलाची कामगिरी बजावली. तर २०१७ ते २०२० पर्यंत कन्हान नगरपरिषद चे नगराध्यक्ष होते. शंकर चहांदे यांनी भाजपा पार्टीत फक्त कार्यकरण्यावर भर देत आपली कामगिरी बजावली. याची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेत त्यांना जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

   शंकर चहांदे यांनी रामटेक लोकसभा क्षेत्रात जनतेची विकासात्मक कामे करीत जनतेचा विश्वास संपादन केल्याने येथील नागरिक आता लोकसभेची उमेदवारी मिळावी. अशी सर्व जनतेत आवर्जून व कळकळीने अनेकांनी इच्छा जाहीर केल्या आहे. जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रामटेक लोकसभा क्षेत्रासह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवसेना पक्षात असंख्य महिलांची नियुक्ती व प्रवेश 

Sun Jul 16 , 2023
शिवसेना पक्षात असंख्य महिलांची नियुक्ती व प्रवेश कन्हान,ता.१६ जुलै       कन्हान येथील महिलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.१५ जुलै) रोजी महिला आघाडीत प्रवेश केला.       जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले, संपर्क प्रमुख उत्तम […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta