मुलगा “आरुष” ला शिव्या दिल्याचा वादातुन युवकाची हत्या
चौथा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी अटक
कन्हान,ता.२१ जूलै
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर शिवार येथील शितला माता मंदिरा जवळ “आरुष” ला शिव्या दिल्याचा वादातुन भरदिवसा युवकाची हत्या केल्याने नागरिकांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, गुरुवार (दि.२०) जुलै रोजी सकाळी ९ वा. दरम्यान जख्मी युवराज भीमराव गायकवाड (वय ३०) मोठा भाऊ मृतक जयराज भीमराव गायकवाड (वय ३७) दोन्ही रा. सत्रापुर, कन्हान आपल्या घरी असतांना युवराज यांचा पुतण्या आरुष हा घरी रडत रडत आला. मोठे भाऊ मृतक जयराज गायकवाड यांनी आरुष का झाले ? असे विचारले असता आरुष ने सांगितले कि, मला घराजवळ राहणारा भेडंग पुरवले व त्याचे मुलांनी शिव्या दिल्या आहे. या वरुन युवराज व मोठा भाऊ जयराज आरुष ला घेऊन घराबाहेर निघाले. भेडंग पुरवले, देवेन पुरवले, साहिल पुरवले व सतीश सोनबर्से हे घराजवळ आले व उलट ‘आरूष ने त्यांना शिव्या दिल्या असे म्हणुन त्यांचा सोबत वाद करु लागले. तेवड्यात भेडंग पुरवले याने ब्लेड ने युवराजच्या पाठीवर उजव्या बाजुस वार करुन गंभीर जख्मी केले. युवराजच्या रक्त पाहुण मोठे भाऊ जयराज याने भेडंग पुरवले व देवेन पुरवले यांना पकडण्याचा प्रयत्न केला. भेडंग पुरवले, साहिल पुरवले व सतीश सोनबर्से यांनी पकडुन ठेवून हात बुक्क्याने मारपीट केली. अचानक देवेन पुरवले याने त्याचा जवळील धारदार चाकूने जयराजचा पोटावर सपासप वार करून जख्मी केले. घटनेची माहिती कन्हान पोलीसांना माहिती होताच पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पोलीस निरीक्षक सी.बी चव्हान, मुदस्सर जमाल, हरीष सोनभ्रदे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचले. पंचनामा करुन जख्मी युवकांना प्रथम उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले. डॉक्टरांनी तपासुण कामठी येथे दाखल केले उपचारा दरम्यान जयराज गायकवाड याचा मृत्यु झाला . मृत्यु झाल्याची माहिती पोलीसांना मिळताच सहायक फौजदार गणेश पाल, सचिन वेळेवर , मुदस्सर जमाल यांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले . जयराज गायकवाड याचा मृत्यु नंतर काही वेळेकरिता नातेवाईकांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाला होता. घटनेचे गंभीर्याने घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन कन्हान पोलीसांना उचित कार्यवाही चे आदेश दिल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी भेडंग पुरवले, साहिल भेडंग पुरवले, देवेन भेंडंग पुरवले, सतीश सोनबर्से सर्व राहणार सत्रापुर यांना पकडुन युवराज गायकवाड यांचा तक्रारी वरून चार ही आरोपी विरुद्ध कलम ३०२ , ३०७ ,३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर , सहायक पोलीस निरीक्षक राजेश जोशी हे करीत आहे .
Post Views: 744
Sat Jul 22 , 2023
जय तुर्रा प्रकाश मंडळ,नांदगाव तर्फे गुरूपूजा संपन्न शासनाने शाहीर कलाकारांच्या मागण्या पूर्ण करावे – शा.बावनकुळे कन्हान,ता.२१ जुलै नांदगाव ( येसंबा) येथे नुकतेच जय तुर्रा प्रकाश मंडळ तर्फे गूरुपुजा उत्साहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी शाहीर राजेंद्र बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ, मानधन समिती सदस्य यांनी […]