महामार्ग पोलिसांनी वाचविले चिमुकल्यासह चौघांचे प्राण
कन्हान,ता.०३ ऑगस्ट
नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरिल अण्णा मोड डुमरी जवळ ट्रक चालकाने आपले वाहन विरूध्द दिशेने व निष्काळजीपणे चालवुन रूग्णवाहिकेला सामोरासामोर धडक दिल्याने भर पावसात झालेल्या अपघातात रूग्णवाहिका चालक, नर्स, प्रसुत महिला व तिचे दहा दिवसांचे बाळ जख्मी अवस्थेत रूग्णवाहिकेत अडकलेल्यांने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्यासह चार लोकांचे प्राण वाचवुन खोळबंलेला महामार्ग सुरळित केला.
गुरूवार (दि.३) ऑगस्ट रोजी महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कॅम्प टेकाडी प्रभारी पोलिस निरिक्षक सचिन सेलोकर सहकारी पोलीस कर्मचा-यांसह राष्ट्रीय महामार्ग क्रं. ४४ वर पेट्रोलिंग करित होते. दुपारी १ वाजता दरम्यान अण्णा मोड डुमरी जवळ नागपुर वरून जबलपुर कडे जाणारा ट्रक क्र.एम.पी १६ एच २३१८ च्या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन विरूध्द दिशेने व भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवुन रामटेक वरून नागपुर कडे जात असलेल्या दुसऱ्या लेन वरील रूग्णवाहिका क्र. एम.एच ४० वए. के ३५६३ ला सामोरासमोर जोरदार धडक मारली.
या अपघातात रूग्णवाहिका चालक विकी महाजन याचा ड्रायव्हिंग सीट मध्ये हात अडकल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. नर्स धनश्री मेश्राम व प्रसुती रूग्ण महिला यांच्या दोघांचा डोक्याला गंभीर मार लागला. तात्काळ महिला नर्सला, बाळाला, वाहन चालकाला व बांळती महिलेला पोलीस कर्मचा-यांच्या व स्थानिक लोकांच्या मदतीने त्वरित बाहेर काढुन एनएचआयच्या रूग्णवाहिकेने उपचाराकरिता शासकिय दवाखाना मेडीकल नागपुर येथे पाठविण्यात आले. अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावर आडवी झाल्याने व पाऊस येत असल्याने वाहतुक पूर्णपणे खोळबंली गेली होती. पोलीस कर्मचा-यांच्या सहकार्याने अपघातग्रस्त वाहनाना रस्त्याच्या बाजुला उभी करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली. ही कार्यवाही महामार्ग पोलीस केंद्र राम टेक कॅम्प टेकाडी, प्रभारी पोलिस निरिक्षक सचिन सेलोकर, बुंदे साहेब, येडे, दोडके, रामटेके आदी पोलीस कर्मचा-यानी त्वरित समयसुचकता दाखवित रूग्णवाहिका चालक, नर्स, बाळंतिन महिला व दहा दिवसांचे चिमुकले बाळा सोबत चार अपघात ग्रस्ताचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला.
Post Views: 866
Sat Aug 5 , 2023
सावनेर पोलीस की सतर्कतासे 24 गौवंशको मीला जीवनदान सावनेर पोलीस को अवैध रुपसे हो रहे गौवंशके परिवहन की गुप्त सुचनाके आधारपर सावनेर थाना अंतर्गत खापा पाटनसावंगी रेल्वे गेटके पास नाकाबंदीके दौरान एक आयसर तथा दो पीकअप व्हँनमे कुल 24 भैस तथा एक बछडेको बडेही निर्दयतासे बांधकर लेजाते हुये पकडा गया. […]