धर्मराज प्राथमिक शाळेतर्फे विद्यार्थी निर्मित चांद्रयान प्रतिकृती
कन्हान,ता.२३ ऑगस्ट
चांद्रयान ३ च्या यशस्वीतेसाठी धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री- कन्हानच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चांद्रयानची प्रतिकृती तयार करुन भारत माता की जय, वंदे मातरम, चांद्रयान विजयी भव ! अशा घोषणा देत चांद्रयान ३ या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
चांद्रयान ३ या मोहिमे विषयी मुख्याध्यापक खिमेश बढिये व शिक्षक अमित मेंघरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली व संध्याकाळी प्रक्षेपण होणारा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जुन पहावा असे आवाहन केले.
धर्मराज प्राथमिक शाळेच्या परिसरात चांद्रयान -३ प्रतिकृती निर्माण करण्यासाठी मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या नेतृत्वाखाली अमित मेंघरे, भिमराव शिंदेमेश्राम, राजु भस्मे, किशोर जिभकाटे, कु हर्षकला चौधरी, कु अर्पणा बावनकुळे, कु प्रिती सुरजबंसी, कु पूजा धांडे, सौ.चित्रलेखा धान फोले, कु कांचन बावनकुळे, सौ.सुनिता मनगटे, सौ.सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार यांनी सहकार्य केले. या अभिनव उपक्रमाचे व संकल्पनेचे गटशिक्षणाधिकारी सौ.वंदना हटवार, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे, केंद्र प्रमुख सौ लता माळोदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय कापसीकर व पालकांनी अभिनंदन केले.
Post Views: 725
Wed Aug 23 , 2023
गोंडेगाव च्या अश्विन कडनायके बीएसएफ मध्ये नियुक्तीने अभिनंदनाचा वर्षाव कन्हान,ता.२३ ऑगस्ट पारशिवनी तालुक्यात असलेल्या गोंडेगावातील तरूण युवक अश्विन कडनायके याने हलाखीच्या परिस्थिती वर मात करित अभ्यास व मेहनत करून देश सेवेचे ध्येय गाठत बीएसएफ मध्ये नियुक्ती झाल्याने ग्रा.प.गोंडेगाव व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करून अभिनंदनाच्या वर्षाव केला आहे. […]