संतप्त नागरिकांनी वेकोलि चेक पोस्ट वर मुतदेह सह चार तास केले धरणे आंदोलन
सुनिल केदार यांच्या पुढाकारे मृतकाच्या पत्नीस वेकोलि खदान मध्ये कंत्राटी नौकरी व नुकसान भरपाई चे दिले आश्वासन.
कन्हान,ता.२९ ऑगस्ट
वेकोलि कामठी खुली कोळसा खदान च्या ब्लॉस्टिंग च्या हादराने घर कोसळुन मलब्यात दबुन खाटेवर आराम करित असलेल्या बापलेकीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने महसुल, पोलीस प्रशासन पोहचुन परिस्थिती नियंत्रणात करित वेकोलि अधिका-याच्या म्हण्यानुसार उपक्षेत्र कार्यालयात अधिका-यासह मृतकांचे नातेवाईक स्थानिय पुढारी व नाभिक एकता मंच पदाधिकारी चे शिष्टमंडळाने चर्चा केल्यावरही वेकोलि कामठी उपक्षेत्रिय प्रबंधक दीक्षीत काहीही मान्य करता समाधान न केल्याने संतप्त लोकांनी वेकोलि खुली खदान चेक पोस्ट वर दोन्ही मृतदेहासह चार तास धरणे आंदोलन करित कोळसा वाहतुक ठप्प केली. तरी वेकोलि अधिका-यांनी फोन बंद करून निरूत्तर केल्याने माजी मंत्री व आमदार सुनिल केदार यांच्या पुढाकाराने वेकोलि सीएमडी यांनी मृतकाच्या पत्नीस खदान मध्ये कंत्राटी नौकरी व समिती व्दारे सर्व्हे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही मृतदेह नेऊन उशिरा रात्री अंतिम संस्कार करण्यात आला.
सोमवार (दि.२८) ऑगस्ट ला दुपारी १ वाजता दरम्यान सलुन दुकान बंद असल्याने कमलेश गजानन कोठेकर हे आपल्या ६ वर्षाय कु यादवी या मुलीसह खाटेवर आराम करित होता. वेकोलि कामठी खुली कोळसा खदानीच्या जबरदस्त ब्लॉस्टिंग हादराने घर कोसळुन बापलेकीचा घराच्या मलब्यात दबुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची बातमी पसरताच लोकांची चांगलीच गर्दी झाल्याने कांद्री माजी सरपंच बळवंत पडोळे, माजी उपसरपंच श्याम बर्वे, माजी जि प सदस्य योगेश वाडीभस्मे, गज्जु यादव, नरेश पोटभरे, नाभिक एकता मंच पदाधिकारी शरद वाटकर, नरेश लक्षणे, सुनिल लक्षने, आकाश पंडीतकर, संतोष दहिफळकर सह बरेच मान्यवरांच्या उपस्थित संतप्त नागरिकांनी वेकोलि अधिका-यावर तिव्र रोष व्यकत केला. वेकोलिने माती डम्पिंग व ब्लॉस्टिंग बंद करून घटनेस दोषी संबधित वेकोलि अधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या पत्नी नौकरी आणि झालेली जिवहानी वर घराची नुकसान भरपाई देण्या ची मागणी करण्यात आली. यावेळी पारशिवनी प्रभारी तहसिलदार रंजित दुसावार, तलाठी श्रीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते आपल्या स्टाप सह पोहचुन दोन्ही मृत्युदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवुन परिस्थितीवर नियंत्रण करित वेकोलि अधिकारी घटनास्थळी येण्यास नकार देऊन मोजके लोकांसह कामठी उपक्षेत्र कार्यालयात भेटण्यास बोलाविले.
महसुल व पोलीस अधिका-यासह मृतकांचे नातेवाईक, स्थानिय पुढारी व नाभिक एकता मंच पदाधिकारी शिष्टमंडळाने चर्चा करून योग्य मागणीस वेकोलि कामठी उपक्षेत्रिय प्रबंधक दीक्षीत काहीही अमान्य करित समाधान न केल्याने संतप्त लोकांनी वेकोलि खुली खदान चेक पोस्टवर दोन्ही मृतदेहासह चार तास धरणे आंदोलन करित कोळसा वाहतुक ठप्प केली. तरी वेकोलि अधिका-यांनी फोन बंद करून निरूत्तर केल्याने माजी मंत्री व सावनेर चे आमदार सुनिल केदार यांनी पोहचुन पुढाकार घेत वेकोलि सीएमडी यांनी मृतकाच्या पत्नीस खदान मध्ये कंत्राटी नौकरी व समिती व्दारे सर्व्हे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही मृतदेह नेऊन उशिरा रात्री अंतिम संस्कार करण्यात आला.
संतप्त लोकांच्या वेकोलि चेक पोस्टवर धरणे आंदोलनात माजी मंत्री व सावनेर आमदार सुनिल केदार, कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, माजी आमदार डी.एम.रेडडी, माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे, पं.स.सभापती मंगला निबोंने, उपसभापती करुणा भोवते, बळवंत पडोळे, श्याम बर्वे, सिताराम भारव्दाज, सुखलाल मडावी,चंद्रशेखर बावनकुळे, बैसाखु जनबंधु, महेश झोडावणे, गणेश सरोदे, राहुल टेकाम, नाभिक एकता मंच चे शरद वाटकर, नरेश लक्षने, संतोष दहिफळकर, सुनिल लक्षने, आकाश पंडीतकर, रोशन बोरकर, किशोर गाडगे, छ्त्रपती येस्कर, दत्तु खडसे, सुहास पूंडे , दिलीप गाडगे, प्रफुल लक्षणे, संदीप माहुलकर, प्रभाकर कावळे, राजेंद्र घोटेकर,भगवान कावळे सह मोठया संख्येने परिसरातील महिला पुरूष उपस्थित झाले होते.
घटनेचे गांभिर्य लक्षात घेत रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, पारशिवनी प्रभारी तहसिलदार रंजित दुसावार, तलाठी श्रीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते यांनी दंगा पथकासह कडक पोलीस बंदोबस्त ठेवुन परिस्थिती नियंत्रण मिळविले.
घटनेच्या वेळी मृतकांची पत्नी उषा हातमजुरी च्या कामाला गेली होती. तर आई यमुनाबाई बाजुला बसायला गेली आणि मुलगा यश हा चाकलेट घेण्यास गेल्याने सुखरूप वाचले. मृतक कमलेश कोठेकर यांचे नागपुर जबलपुर रोडवर धर्मराज शाळे सामोर छोटेशे सलुन चे दुकान चालवुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करित होता. घरचा कर्ता पुरूष व छोटी मुलीचा दुदैवी मृत्यु झाल्याने मृतकाचे वडिल गजानन कोठेकर, आई यमुनाबाई कोठेकर, पत्नी उषा, सवा वर्षा लहान मुलगा यश कमलेश कोठेकर सह त्याच्या परिवारावर भयंकर संकटाचे डोंगर कोसळला आहे.
Post Views: 759
Wed Aug 30 , 2023
तालुका स्तरिय शालेय खो-खो स्पर्धेत दखणे हायस्कुल चा दबदबा कन्हान,ता.२९ पारशिवनी तालुका क्रिडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या हरिहर विद्यालय पारशिवनी येथील शालेय तालुका स्तरिय खो-खो क्रिडा स्पर्धेत मुले १७ वर्ष आत वयोगटात घेण्यात आली. बळीराम दखणे हायस्कुल कन्हान च्या खेडाळुनी विजय प्राप्त करून काटोल येथे होणा-या जिल्हास्तरिय खो-खो […]