तालुका स्तरिय शालेय खो-खो स्पर्धेत दखणे हायस्कुल चा दबदबा
कन्हान,ता.२९
पारशिवनी तालुका क्रिडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या हरिहर विद्यालय पारशिवनी येथील शालेय तालुका स्तरिय खो-खो क्रिडा स्पर्धेत मुले १७ वर्ष आत वयोगटात घेण्यात आली. बळीराम दखणे हायस्कुल कन्हान च्या खेडाळुनी विजय प्राप्त करून काटोल येथे होणा-या जिल्हास्तरिय खो-खो स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केल्याने विद्यार्थी खेडाळु व क्रिडा शिक्षक काठोके सर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभागाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषदेच्या वतीने सत्र २०२३-२०२४ या सत्रातील तालुका स्तरीय शालेय खो-खो क्रिडा स्पर्धा पारशिवनी येथील हरिहर विद्यालयात घेण्यात आले.
या शालेय खो-खो स्पर्धेत बळीरामजी दखणे हायस्कुल कन्हान च्या विद्यार्थी खेडाळुंनी मुले १७ वर्ष आत वयोगटात अंतिम सामन्यात हरिहर विद्यालय पारशिवनी ला मात दिली. पुन्हा एकदा बळीरामजी दखणे हायस्कुलने विजय प्राप्त करून आपले वर्चस्व कायम करित काटोल येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत प्रवेश निश्चित केले. बळीरामजी दखणे हायस्कुल प्राचार्य सौ विशाखा ठमके यांनी विजयी खेळाडूंचे व क्रिडा शिक्षक माधव काठोके यांचे कौतुक करित अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धे यशा करिता शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेला उपस्थित शिक्षक विलास, अमित थटेरे व खेळाडुंना मार्गदर्शन करणारे गणवीर, अनिकेत वैद्य आणि निखिल या माजी खेळाडूंनी सुद्धां विजयी खेळाडूंचे व क्रिडा शिक्षक माधव काठोके यांचे अभिनंदन केले.
Post Views: 744
Wed Aug 30 , 2023
श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह संपन्न सावनेर: श्रीसंत सीताराम माहाराज देवस्थान सावनेरचा वतीने श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण शुद्ध षष्ठी ते श्रावण शुद्ध त्रयोदशी 22 ऑगस्ट ते 29 ऑगस्टला साजरा करण्यात आला. या हरिनाम सप्ताहात श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीचा अभिषेक,पूजा अर्चना करुण सप्ताहाला प्रारंभ झाला. सतत ८ दिवस चलणाऱ्या सप्ताहात दैनंदीन पहाटे काकड़ा,सकाळी आरती, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ,रात्री भजन अश्या विविध […]