विभागिय कुस्ती स्पर्धेत समिर महल्ले विजयी, राज्यस्तरिय स्पर्धेत प्रवेश
कन्हान, ता.२१
सेट केसरीमल पोरवाल कनिष्ट महाविद्यालयचा विद्यार्थी व केरडी व्यायाम शाळेचा खेडाळु समिर महल्ले यांनी विदर्भस्तरिय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रंमाक पटकावित कोल्हापुर येथे होणार राज्यस्तरिय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सेट केसरीमल पोरवाल कनिष्ट महाविद्यालय कामठी इयत्ता १२ वी चा विद्यार्थी आणि जय बजरंग व्यायाम शाळा केरडी चा खेडाळु समिर राजेंद्र महल्ले हा १७ वर्षा आत व ६३ किलो वजन गट कुस्ती क्रिडा स्पर्धेत सहभागी झाला होता. तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावित मंगळवार (दि.१९) देवळी जि.वर्धा येथे संपन्न झालेल्या विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत समिर महल्ले याने चंद्रपुर च्या मोहित या प्रतिस्पर्ध्यांला धुळ चारत प्रथम क्रंमाक पटकाविला.
विजयी होत (दि.२४) ते (दि.२७) सप्टेंबर २०२३ ला कोल्हापुर येथे होणा-या राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. विजयी विद्यार्थी खेडाळु समिर महल्ले ने मार्गदर्शक प्राध्यापिका माला नागपुरे, जय बजरंग व्यायाम शाळा केरडी अध्यक्ष दयाराम भोयर, वस्ताद सेवक गडे, वडिल राजेंद्र महल्ले यांचें आभार व्यकत केले आहे. समिर महल्ले यांने विदर्भ स्तरिय कुस्ती स्पर्धेत विजय प्राप्त करून राज्यस्तरिय कुस्ती क्रिडा स्पर्धे करिता निवड झाल्याने देवाजी भोयर, प्रविण शेलारे, ज्ञानेश्वर कोठेकर, महेश वानखडे, महेन्द्र वानखेडे, सुनिल वतेकर, नितेश वानखेडे, रविंद्र महल्ले, कुणाल ठाकरे आदी सह केरडी ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील यशा करिता शुभेच्छा दिल्या आहे.
Post Views: 766
Fri Sep 22 , 2023
श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी साजरी कन्हान, ता.२१ श्री संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी श्री संत गजानन महाराज मंदीर कन्हान व कांद्री येथे भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. बधवार (दि.२०) सप्टेंबर ला श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य कन्हान शहरातील पांधन रोड, तिवाडे ले-आऊट श्री हनुमान […]