भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कडुन विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम
कन्हान,ता.३०
गणपती विसर्जनानंतर रविवार सकाळी काली माता मंदिर,कन्हान नदी किनाऱ्यावर भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
” आपले कन्हान शहर आपली जबाबदारी” असे म्हणत चिंटू वाकुडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस गणपती विसर्जन केल्यानंतर सर्वत्र कचरा जमा झाले होते.
विसर्जनानंतर असलेला निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचरा जमा करून मोठ्या पिशव्या मध्ये गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट करण्यात आली.
यावेळी सफाई मोहीमेत भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी चिंटू वाकुडकर, समशेर पुरवले, सुनील लक्षणें, हरीश तीडके. श्रीकृष्ण माकडे, सुमित नितनवरे, आशिष वानखेडे, रजनीश मेश्राम आदींनी देखील कार्यक्रमाला परिश्रम घेतले.