*विद्यापीठ महिला हाॅलीबाॅल स्पर्धेत सावनेरचे डाॅ.हरिभाऊ आदमने महाविद्यालय विजेता*
सावनेर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित नुकत्याच पार पडलेल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमधे डॉ.हरिभाऊ आदमने कॉलेज सावनेर ह्यांनी विजेते पद पटकावलेले आहे.
सदर्हू स्पर्धा विद्यापीठाद्वारे आयोजित असून ती जी.एस. कॉमर्स कॉलेज ,वर्धा येथे घेण्यात आली.या मैदानावर संपन्न झालेल्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेमधे अंतिम सामना डॉ. हरिभाऊ आदमने काॅलेज, सावनेर विरुद्ध एम. बी. पटेल कॉलेज ,साकोली यांच्यामध्ये रंगला.या सामन्यात आदमने महाविद्यालयाने पहिला सेट 25-16 दुसरा सेट 27-25 व तिसरा सेट 25-18 अश्या फरकाने पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला.
या सामन्यात सैनान कोरी ला बेस्ट सेटर चा पुरस्कार मिळाला. प्रवीना पारसे.निकिता खोरगडे. निकिता बंड,प्राची धोटे,सुहानी बिरबल.अंजली कोकोडे यांनी चमकदार कामगिरी केली.विशेष पुरस्कार वितरण सोहळयात रा.तु.म.विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विद्यापीठ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून डाॅ.आदमने महाविद्यालयाचा लौकिक वाढविला.याबद्दल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश किमटा यांचे व स्पर्धेत सहभागी सर्व चमूंचे प्राचार्य डॉ.विरेंद्र जुमडे यांनी अभिनंदन केले. या महाविद्यालयाचे नाव ऊंचवल्याबद्दल शारीरिक शिक्षण विभागाचे विभागातील सहकारी डॉ.योगेश पाटील व प्रा.कपिल खुबालकर यांना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 999
Sat Nov 11 , 2023
सावनेर : नवरात्री पासुन सुरु झालेल्या सणासुदीच्या ,दिवाळीच्या निमित्त शहरातील नागरिकांचा उत्साह शांततेचे वातावरण लक्षात घेत , सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी समस्त शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याची आणि शांततेत व सहकार्य करित दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत खालील महत्वाच्या सुचना दिल्यात. 1) आपण बाहेरगावी जाताना घरामध्ये कोणते […]