चिमूर तालुक्यात दिव्यांग विद्यार्थांना साहित्य वाटप
चिमूर,ता.२६
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत अंगणवाडी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना (दि.२६) डिसेंबर रोजी गट साधन केंद्र पंचायत समिती चिमूर येथे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रुपेश कामळी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विनायक औतकर गट समन्वयक गट साधन केंद्र चिमूर, विनोद गेडाम केंद्रप्रमुख- बोथली, पालक, दिव्यांग विद्यार्थी, समावेशित शिक्षण तज्ञ, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व रोखपाल उपस्थित होते. प्रसंगी समावेशित शिक्षण अंतर्गत व्हीलचेअर -१५ रो लेटर -५, श्रवण यंत्र-१२ इत्यादी साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गजानन काळे, समावेशित तज्ञ सचिन लुहूरे समावेशित तज्ञ यांनी केले तसेच नरेंद्र काकडे, भिमेश पिल्लेवान, रणजित चावरे विशेष शिक्षक या सर्वांनी सहकार्य केले.
Post Views: 710
Wed Jan 3 , 2024
हिराबाई शाळेत सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी कन्हान, ता.०३ हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे विविध स्पर्धा आयोजित करुन सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात पार पडली. सावित्रीबाई फुले यांचा जयंती निमित्य बुधवार (दि.३) जानेवारी हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले […]