“हीट अँड रन” कायद्याचा विरोधात वाहन चालकांचे निषेध मोर्चा
पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन
कन्हान,ता.०३
केंद्र सरकार ने तयार केलेल्या “हीट अँड रन” कायद्याचा विरोधात कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटना द्वारे वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन करुन पोलीस निरीक्षका मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवुन “हीट अँड रन” कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या नवीन वाहतुक कायदा विरोधात १ जानेवारी पासुन देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गा वरची वाहतुक खोळंबली आहे.
नवीन कायद्यानुसार ट्रक ने अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतुद आहे. या कायद्याचा विरोधात वाहन चालकां मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाले आहे.
मंगळवार रोजी कन्हान येथे मानवाधिकार संरक्षण संघटना पारशिवनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके यांचा नेतृत्वात वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निर्दशने करुन पोलीस स्टेशन ते तारसा चौक आणि परत तारसा चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढत धरना प्रदर्शन करुन”हीट अँड रन” कायदाचा विरोध केला आणि पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवुन “हीट अँड रन” कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
प्रसंगी एस.बि.थामस, नरेंद्र पात्रे, ओमप्रकाश भुरे, रवि भायगोले, विष्णु पाहुणे, चंद्रभान, प्रज्वल पाहुणे, प्रदिप इंगोले, अखिलेश गेडाम, तुलसीदास राऊत, शेषराव ठवकर, रंजित वासनिक, संभा मारबते, प्रदिप भुरे, अमोल भोयर, गजनलाल सिरसाम , संपत बावने, निलकंठ मेश्राम, विशाल सोनावने, राजु कश्यप, बादल देवगडे, प्रमोद जामकर, सुभाष मेश्राम, रोशन मेश्राम, विक्की ढोबळे सह आदि वाहन चालक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Post Views: 696
Thu Jan 4 , 2024
भीमा कोरेगाव विजयी दिना निमित्त अभिवादन कन्हान, ता.०३ १ जानेवारी १८१८ रोजी ५०० महार योद्धे २८,००० हजार पेशवाई सैनिकांशी लढले आणि भीमा कोरेगावच्या रणांगणावर विजयी झाले. प्रसंगी संपूर्ण भारत देशात भीमा कोरेगाव शौर्य दिवस विजयी दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. सोमवार (दि.१) जानेवारी रोजी रिपब्लिकन सांस्कृतिक संघ […]