भीमा कोरेगाव विजयी दिना निमित्त अभिवादन
कन्हान, ता.०३
१ जानेवारी १८१८ रोजी ५०० महार योद्धे २८,००० हजार पेशवाई सैनिकांशी लढले आणि भीमा कोरेगावच्या रणांगणावर विजयी झाले. प्रसंगी संपूर्ण भारत देशात भीमा कोरेगाव शौर्य दिवस विजयी दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
सोमवार (दि.१) जानेवारी रोजी रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान, नागपूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभ व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भव्य माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात विशेषत: दीक्षा भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व महाबोधी महाविहार बौद्ध गय्या मुक्ती आंदोलनाचे प्रेरणास्थान आदरणीय सुरेई ससाई यांच्या हस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुहिक भोजनदानाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघ संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, चेतन मेश्राम, मनोज गोंडाणे, कैलास बोरकर, आनंद चव्हाण, नितीन मेश्राम, पृथ्वीराज चव्हाण, राजकुमार बागडे, अमोल मेश्राम, शैलेश दिवे, अभिजीत चांदूरकर, अश्वमेध पाटील, संजय गजभिये, आदी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमात समता सैनिक दल यांच्या वतीने १२ डिसेंबर ला मध्यरात्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला मानवंदना देण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमिला घोडेश्वर, सिंधू वाघमारे, सारिका धारगावे, माया चिमणकर, वैशाली थोरात, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व बौद्ध अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन चेतन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन रोहित मानवटकर यांनी केले.
Post Views: 659
Mon Jan 8 , 2024
विधानसभा अध्यक्षपदी तिबोले यांची निवड सावनेर. समाजसेवक सुधाकर तिबोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावनेर- कळमेश्वर विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आयोजीत कार्यक्रमात तिबोले यांना नियुक्तपत्र […]