33.75 लाख रुपयांचा गुटखा जप्त
आरोपी फरार, तेलकामठी रोडवर कारवाई
सावनेर : स्थानिक पोलिसांचे डीबी पथकाची मोठी कारवाही
तेलकामठीजवळ कंटेनरचा पाठलाग करून 33 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात आला. यामध्ये वाहनासह 33 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हेटी ते तेलकामठी रस्त्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग केला असता पोलिसांना पाहताच कंटेनर चालकाने कंटेनर रस्त्यावर उभा करून तेथून पळ काढला. कंटेनर क्रमांक RJ-11//GC-5813 ची तपासणी करण्यात आली. यामध्ये बंदी असलेला गुटखा आणि सुगंधयुक्त तंबाखूची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. अधिकारी ए.व्ही. बाभरे यांनी पंचनामा केला. यामध्ये 33 लाख 75 हजार रुपयांचा गुटखा आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 63 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावनेर पोलिस ठाण्यात आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक संदिप पखाले , सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पोलीस स्टेशन सावनेर यांचे नेतृत्वात सपोनी शरद भस्मे, गणेश रॉय, अविनाश बाहेकर, रवि मेश्राम, प्रमिला चौधरी, दाउद मोहम्मद, अंकुश शास्त्री,किशोर राठोड यांनी केली.