सावनेरच्या ध्रुव पीसेची 14 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड
सावनेर : मैदाने असली नसली तरी प्रतिभावान खेळाडू निर्माण होतील असे नेहमीच बोलले जाते, मात्र आजच्या स्थितित सावनेरमध्ये खेळासाठी एकही मैदान नसल्याने व कुटुंब आणि त्याचे शहराचे नाव उंचावण्याच्या इच्छेने सावनेरच्या ध्रुव शक्तीकांता पिसे यांच्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा जागृत झाली आणि त्याकरिता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ध्रुव रोज मेहनत घेतो.
14 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. विदर्भ लीगचा सामना रायपूरमध्ये २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत खेळवला जाईल. आज युवक आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सावनेर नगरीच्या या खेळाडूने आपल्या कुटुंबासह शहरवासीयांना अभिमान वाटला आहे.
क्रीडाविश्वातील नव्या पिढीसाठी हे प्रेरणादायी असून ध्रुवच्या उज्वल भविष्यासाठी सामाजिक व धार्मिक संघटना शुभेच्छा देत आहेत तर सावनेर शहरात मैदान नसल्याची खंत व्यक्त करित आहे.
Post Views: 1,023