सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले : १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास

सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले

१५ मिनीटाच्या चोरीत १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास

सावनेर : गॅस वेल्डींग कटरने एसबीआय चे एटीएम फोडून दहा लाख छत्तीस हजाराची रक्कम चोरटयांनी उडवीली ही घटना आज पहाटे 3:53  च्या सुमारास बाजार चौकातील शासकीय दुध डेअरी च्या काही अंतरावर असलेल्या घटे यांच्या घराशेजारील असलेल्या एटीएम मध्ये घडली.

सीसीटीव्ही फुटेज च्या रेकॉर्डींग नुसार आज दि. 30 रोजी पहाटे 3:53-55 च्या सुमारास वरणा कारने काही चार ते पाच लोकांनी येवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले बाजूला असलेल्या एचडीएफसी च्या एटीएम मध्ये असलेला कॅमेरा तोडला व नंतर एसबी आयचे एटीएम गॅस कटरने तोडून त्यातील दहा लाख 36 हजाराची रक्कम घेवून चोरटे पसार झाले. यासंमधी मकान मालक प्रविण घटे यांनी सावनेर पोलिसांना पाच मिनिटात फोनकरून माहिती दिली.
सावनेर येथून एटीएम फोडून चोर हे नागपूर दिशेने पळाले मात्र पाटणसावंगी टोल नाक्यावर टोल न भरता एका ट्रक मागून आपली कार काढून चोरटयांनी धूम ठोकली असे बोलले जात आहे.

एचडीएफसी बैंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न,  कॅमेरे केले काळे; सायरन वाजले आणि चोरटे पसार…


बस स्थानक जवळील बसवार कॉम्लेक्स येथील एचडीएफसी बैकेच्या एटीएमची रात्री 1:30 च्या सुमारास दोघांनी कारने येवून पहाणी करून गेले व पहाटे 3:53 ला येवून बैंकेचे कॅमेरे काळे करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र बैंकेचे सायरन वाजल्याने चोरटयांनी धुम ठोकली.

शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच शहरातील अपप्रवृत्तींवर वचक बसवण्यासाठी नगरपरिषद कधी पाऊल उचलणार ,
नगरपरिषद यांनी सावनेर मध्ये सुरुवात होणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर चौकाचौकात सीसीटीव्ही लावणे किती गरजेचे आहे. हे समजलं पाहिजे.*जेणेकरून पोलिसांना बराच फायदा होऊ शकतो* आणि त्याचे सर्व फुटेज पोलीस स्टेशन मध्ये देण्यात यावं,चोऱ्या, मारामारी, आणि होणाऱ्या प्रत्येक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद होतात. 
*सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गायक उत्कर्ष वानखेडे चे कन्हान शहरात जल्लोषात स्वागत

Tue Feb 6 , 2024
गायक उत्कर्ष वानखेडे चे कन्हान शहरात जल्लोषात स्वागत कन्हान, ता.६ फेब्रुवारी      सोनी टीव्ही वाहिनीवर यावर्षी ” इंडियन आयडॉल ” या संगीतमय मालिकेचे सीझन १४ सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करित त्याने टॉप १० मध्ये प्रवेश मिळवला. संपुर्ण शो […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta