‘रामधाम’येथे ७५ जोडप्यांचे’शुभमंगलम’

रामधाम’येथे ७५ जोडप्यांचे ‘शुभमंगलम’

कन्हान,ता.२७ एप्रिल 

     जिल्ह्यातील मनसर येथे प्रसिद्ध ‘रामधाम’ तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यात गोरगरीब वर-वधूचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येतात.

  या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे सहकार्य लाभते.

     यावर्षी ७५ गरीब वर-वधुंचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने पार पडले. सन २००५ पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडल्या जात आहेत. आतापर्यंत सुमारे १२६६ जोडप्यांचे “शुभमंगलम” रामधाम येथे झाले आहे. यावर्षी ७५ गरीब वर-वधुंचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.

   जि.प. शाळेतून सर्व ७५ नवरदेवांना ट्रेलरवर बसवून डी.जे, बँड, आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली. त्यानंतर हिंदू, बौद्ध व आदिवासी समाजाच्या रितिरिवाजाने ७५ जोडपे विवाहबंधनात अडकले.

   या सर्व नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. नवविवाहिताना भेट वस्तू देण्यात आल्या, तर माजी आमदार रमेशचंद्र बंग, जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकोडे, एस क्यू जमा, हुकुमचंद आमघरे, रश्मी बर्वे, विशाल बरबटे, दयाराम रॉय, जि.प. सदस्य शांतताई कुमरे, ज्योतीताई उमरे, अशोक चिखले, दुर्गाताई सर्याम, योगेश रंगारी, कलाताई ठाकरे, गौरव चौकसे, नवीन चौकसे, देविदास जामदार, ऋषिकेश किंम्मतकर, हेमंत जैन, हेमराज चोखांद्रे, डॉ. इरफान अहमद, कैलास नरुले, बनशीलाल ब्रह्मनोटे, अजय बेडरकर, रवी बावनकुळे, सर्याम साहेब यांनी पुढील आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या माध्यमातून १२६६ लग्न सोहळे

 माझ्या आईने दिलेले वचन मी पूर्ण करतो आहे. १० टक्के रक्कम मी सामाजिक कार्यात खर्च करतो आहे. प्रत्येक वर्षी कुठलेही आर्थिक मदत घेत नसून स्वखर्चाने नवयुवक व युवतींचा लग्नसोहळा पार पडत असतो. हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत १२६६ लग्न सोहळे संस्थेतर्फे पार पडले, असे आयोजक चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ 

Wed Jun 5 , 2024
सावधान, बिबट्याने मुक्काम ठोकला कांन्द्रीत कांद्रीत बिबट आढळुन आल्याने परीसरात खळबळ कन्हान, ता.०५       वेकोलि कामठी खुली कोळसा खदान कांद्री वार्ड क्र. २ च्या लोकवस्ती जवळील नाल्यालगत ओबी माती डम्पींग केली आहे. याच नाल्याजवळ सकाळच्या सुमारास मादी बिबट आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta