गुरू पौर्णिमेला गुरूवर्यांची गुरूपुजा व गुणवंत विद्यार्थी सत्कार
कन्हान,ता.२१ जुलै
गुरू पौर्णिमा सणाच्या मंगलसमयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास (दखने ) हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे रविवार (दि.२१) जुलै डोणेकर सभागृह, कन्हान ला गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू – शिष्यांचे अतुट नाते हिच महाराष्ट्राची उतुंगस्थानी असलेली पुरातन परंपरा ” गुरु पौर्णिमा ” या मंगलसमयी गुरुवर्यांची, गुरुजनांची गुरुपुजा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळयाचे रविवार (दि.२१) जुलै २०२४ ला सायंकाळी ४ वाजता डोणेकर सभागृह मेन रोड, कन्हान येथे माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे आयोजन करून जिवनातील साठविलेल्या वर्गमित्राच्या आठवणी, भावना, ओलावा, सर्वस्वाचा अनंत ठेवा, म्हणुनच या सोहळ्यात गुरुजनांचा आशीर्वाद श्रवण करावा. हे या जन्मीचे ” गुरूतिर्थच “.
गुरूपौर्णिमा सण गुरूवर्यांची, गुरुजनांची गुरूपुजा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगल समयी कृपावंताची प्रामुख्याने उपस्थिती प्रार्थनिय आहे. असे आग्रहाचे आमंत्रण विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ चे माजी वर्गमित्र विद्यार्थी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, विजय डोणेकर, कमलेश पांजरे, हाजी शेरू शेख, अशोक पोटभरे, प्रदीप वानखेडे, शंकर राऊत, प्रेम रोडेकर, गोविंद जुनघरे, दिलीप येलमुले, सौ.लताताई वंजारी, सौ. चंपाताई गजभिये सह वर्गमित्र, मैत्रीनी आदीने केले आहे.
|| दुःख अडवायला उबऱ्या सारखा,
मित्र बनवायचा गारव्या सारखा ||
Post Views: 652
Sun Jul 21 , 2024
वेकोलीच्या रेती-मातीचा ढिगाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कन्हान,ता.२१ प्रतिनिधी पारशिवनी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान, कांद्री परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचे मुख्य कारण कोळसा खदान क्रमांक तीन येथून जमा करण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे आणि लोकांचे वेकोलीच्या कुचकामी व नियोजन शुन्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. […]