वेकोलीच्या रेती-मातीचा ढिगाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
कन्हान,ता.२१ प्रतिनिधी
पारशिवनी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान, कांद्री परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचे मुख्य कारण कोळसा खदान क्रमांक तीन येथून जमा करण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतीचे आणि लोकांचे वेकोलीच्या कुचकामी व नियोजन शुन्यामुळे अतोनात नुकसान होत आहे.
वेकोली बद्दल जनतेने वारंवार तक्रारी करून देखील वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीची गंभीरता ओळखून जमा केलेल्या रेती-मातीचा ढिगारा अद्यापही उचललेला नाही. त्यामुळे तिथे राहणाऱ्या वसाहतीमध्ये बँकेमध्ये तसेच खदान सोसायटी व जवाहरलाल नेहरू चिकित्सालय दरवर्षी पाण्याखाली साचले राहते. यामुळे बरेचदा इमर्जन्सी असणाऱ्या पेशंटला मारण्याचं काम एकप्रकारे डब्लू.सी.एल.चे अधिकारी करीत आहे. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान या मातीच्या ढिगार्यामुळे होत आहे. ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालेले आहे .यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून डब्लू.सी.एल. येथून कोळशाचे उत्पन्न काढल्या जाते ब्लास्टिंगच्या माध्यमातून जमिनीत खोलवर खड्डे करून येथील कोळसा काढला जातो. खड्डे करतेवेळी जी माती दगड आणि रेती जमा होते ती गेली पंधरा वर्षापासून तशीच्या तशीच ढिगारे जमवून ठेवल्या गेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गुडघ्याच्या वर कमरेपर्यंत पाणी साचून पेरणी केलेल्या शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे डब्ल्यू.सी.एल येथे वसाहत असणारी जागा सुद्धा पाण्याने तुडुंब भरलेली दिसून आली. अत्यावश्यक सुविधा असणारी जवाहरलाल नेहरू रूग्णालयाची इमारत ही सुद्धा पाण्याखाली दरवर्षी जाते.
काल झालेल्या पावसामुळे सध्या इंडियन बँक, खदान सोसायटी, शिव मंदिर तसेच खदान वसाहत व आजूबाजूच्या शेतीचा परिसर पाण्याने संपूर्णतः जलमय झालेला आहे .याची कल्पना वरिष्ठांना दिल्यानंतरही डब्लू.सी.एल चे अधिकारी याकडे वारंवार दुर्लक्ष व कानाडोळा करत आहे. या ढिगार्यांमुळे कांद्री व कन्हान येथील लोकांच्या जीवितला फार मोठा धोका निर्माण होत आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच जवाहरलाल नेहरू रूग्णालयात येणाऱ्या अत्यावश्यक आजारी लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागते. याची शासन दरबारी कुणी दखल घेणार आहे का? असा खडा सवाल येथील शेतकरी व परिसरातील नागरिक संतप्ततेने विचारत आहे.
याबाबत दरवर्षी येथील जनप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाते यापूर्वी देखील माजी आमदार खासदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्यांनी मात्र वारंवार याबाबत गंभीरता दाखविली नाही उलट याबाबत त्यांचं कुठेतरी अधिकाऱ्यांशी साठ-लोट असल्याचं बोलल्या जाते. दोन दिवसाच्या पावसात जर इतकं चित्र डोळ्यासमोर दिसत असेल तर येणाऱ्या पुढील पावसाच्या दिवसात येथील नागरिकांचे शेतकऱ्यांचे काय हाल होऊ शकतात याची कल्पना न केलेलीच बरी, पावसाचे पाणी साचल्यामुळे वसाहतीतून ये जा करणाऱ्या शाळकरी कॉलेजचे मुलं तसेच रोज कन्हान-कान्द्री येथे नोकरीच्या निमित्ताने ये-जा करणारी कर्मचारी व सर्वसामान्य जनता यांचा संपर्क दरवर्षी तुटल्या जातो. गेल्या वर्षी अशातच एका गरीब कुटुंबातील कर्त्या इसमाचा जीव गेला इतकी घटना माहीत असताना सुद्धा शासन आणि संबंधित अधिकारी उदासीन आहेत यापुढे दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना समक्ष उभे करून आंदोलनाचा इशारा येथील जनतेने दिलेला आहे. तरी याची संबंधितांनी तसेच लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी येथील जनता करीत आहे.
Post Views: 740
Mon Jul 22 , 2024
सावनेर मधिल चिचपुरा येथिल घटना अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री पेठविल्या दुचाकी व चारचाकी Post Views: 740