दोन एटीएम फोडुन पाच लाख साठ हजार रुपयाची चोरी कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ 

दोन एटीएम फोडुन पाच लाख साठ हजार रुपयाची चोरी

कन्हान शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ 

कन्हान, ता. २३ प्रतिनिधी 

     कन्हान हद्दीतील इंदिरा नगर, तारसा रोड वरील आय.सी.आय.सी.आय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही एटीएम गँस कटर ने कापुन पाच लाख साठ हजार शंभर रूपयांची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले.

      मंगळवार (दि.२३) जुलै च्या पहाटे २ ते ४ वाजता दरम्यान चार चाकी वाहनाने आलेल्या अज्ञात चोरांनी इंदिरा नगर, तारसा रोड, कन्हान येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम च्या सीसीटीव्ही कँमरे वर काळा पेंट स्प्रे करून बँकेचे एटीएम गँस कटर सहाय्याने कापले. इंदिरा नगर च्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मधुन १,०३,००० रूपये आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम मधिल ४,५७,१०० रूपये असे दोन्ही एटीएम मधिल ५,६०,१०० रूपयाची चोरी करून पसार झाले.

 

 

    घटनास्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील आपल्या सहकार्यासह पोहचुन फॉरेक्सीन लँब पथकाला बोलावुन तपास केला. जागेश्वर कुष्णराव पौनीकर (वय ३९ ) राह. मालाधरे विहार जवळ पंडितपुरा, जुनी मंगळवारी रोड, नागपुर चैनल एक्जीक्यूटिव (हिताजी पेमेंट सर्विसेस) यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी थानेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर

Wed Jul 24 , 2024
भारतीय कोळसा खदान मजदूर संघा तर्फे रक्तदान शिबीर कन्हान,ता.२३     भारतीय कोळसा खदान मजदूर संघ उपक्षेत्र गोंडेगाव कोळसा खुली खदान व्दारे शंभराहुन अधिक कामगारांनी रक्तदान करून भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला.       मंगळवार (दि.२३) जुलै ला भारतीय कोळसा खदान मजदूर संघाच्या ७० वा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta