एक रुग्ण एक झाड संकल्पना
एक हजार झाडे वाटपाचा संकल्प
सावनेर ता. : आपण वावरत असलेल्या सामाजिक भावना जोपासात आणि आपल्या अवतीभोवती असलेले वातावरनात चैतन्य निर्मिती तसेच नेहमीच शहरातील व आजुबाजु गावाखेड्यातील गोरगरिबांची हिताचे आणि समाजसेवच्या भावनेतून नेहमीच वेगवेगळी संकल्पना डोक्यात आणून
शहरातील खासगी रुग्णालये, आदित्य रुग्णालय, पुण्यनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, चांडक रुग्णालय, सुखकर्ता बोन अँड जॉइंट क्लिनिक, आस्था आदींच्या संयुक्त प्रयत्नातून एक रुग्ण, एक झाड ही संकल्पना पुढे आणली आहे.
शहरातील युवा तरुण डॉक्टरांकडून डॉ.अमित बाहेती, डॉ.शिवम पुण्यानी, डॉ.आशिष चांडक, डॉ.गुंजन धुंदेले, डॉ.अंकिता बाहेती, रेणुका चांडक, डॉ.स्वाती पुण्यानी, डॉ.प्रवीण चव्हाण, डॉ. श्वेता चव्हाण आदींनी शहरातील पर्यावरणाचे पोषण वातावरण करण्याच्या उद्देशाने ‘एक रुग्ण एक झाड’ योजनेतून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक हजार झाडे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील नवोदित डॉक्टरांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरुवातीला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना सुट्टीझाल्यानंतर एक झाड देऊन त्यांची काळजी घेण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आणि लवकरच सर्व रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना सुमारे एक हजार झाडांचे वाटप करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post Views: 960
Sun Aug 11 , 2024
भक्तगणांची दर्शनासाठी दरबारात हजेरी; ध्वजाजवळ बाबा प्रकट झाल्याची चर्चा वाकीत ताजुद्दीन बाबांच्या पदचिन्हांचे झाले दर्शन सावनेर : तालुक्यातील वाकी येथे ताजुद्दीन बाबांचा प्रसिद्ध दरबार आहे. येथे चमत्कारांची कधीच कमतरता नाही. आजही येथे चिंचेचे झाड आहे, ज्याच्या खाली बाबांनी 12 वर्षे घालवली होती. वाकी वाकी दरबार यथे 8-8-2024 ला पाहाटे 4 […]