पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

कन्हान,ता.१५

    पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा “स्वातंत्र्य वर्धापन दिन” नगर सुधार समितीचे पदाधिकारी, नगरातील गणमान्य नागरिक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

   सर्वप्रथम नगर सुधार समितीच्या अध्यक्षा सौ.छायाताई प्रकाशराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व इयत्ता १० वी ला प्रथम आलेली पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी कु.शर्तिका समरसिंग टेकाम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

     कार्यक्रमाला नगर सुधार समितीचे पदाधिकारी मनोहर कोल्हे, वासुदेव चिकटे, मिलिंद वाघधरे, प्रकाशराव नाईक, दिनकर मस्के व सौ.यशोदाताई हिरालाल कांबळे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती आणि अंबादास चकोले, पुरुषोत्तम कुंभलकर, महेश बिसणे, केतन भिवगडे, वसंतराव इंगोले, सौ मायाताई इंगोले, सौ.सुनिता येरपुडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.

 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रंजना माहूरकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर. लाखपाले सर व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर. बनकर यांनी ७८ व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित नगर सुधार समितीचे पदाधिकारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन केले व ७८ व्या स्वातंत्र वर्धापन दिनानिमित्त व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मार्फत विविध देशभक्ती गीत, भाषणे सादर करण्यात आली. 

      ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.सौ.वंदना गजबे मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकारी, नागरिक गण, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारी यांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

श्री नारायण विद्यालयाने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण 

Fri Aug 16 , 2024
श्री नारायण विद्यालयाने ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कन्हान,ता.१५     श्री नारायण विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन श्री नारायण विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ डॉ.विश्वेश्वर जुनघरे यांच्या अध्यक्षतेखाली एन.बाबु नानन अध्यक्ष श्री नारायण मानव सेवा व शिक्षण प्रसारक मंडळ, कन्हान यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta