स्थानिक पत्रकार निवासाचा प्रश्न मार्गी लावणार – खा.श्यामकुमार बर्वे स्लग : स्मशानघाट बांधकाम लवकरच होणार 

स्थानिक पत्रकार निवासाचा प्रश्न मार्गी लावणार –

खा.श्यामकुमार बर्वे

स्लग : स्मशानघाट बांधकाम लवकरच होणार 

कन्हान,ता.१५

      स्थानिक पत्रकारांना हक्काचे निवास स्थान तसेच पत्रकार परिषदेसाठी पत्रकार भवन निर्मितीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असे आश्वासन रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

   पत्रकार परिषदेला खा.श्यामकुमार बर्वे, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे, ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड उपस्थित होते. पत्रकार परिषदेत कन्हान शहराच्या विकासाकरीता कोणती पाउले उचलावावी, यावर सविस्तर चर्चा झाली. कन्हान शहर व परिसराची लोकसंख्या एक लाखांच्या जवळपास असून अन्त्यविधीसाठी परिसरात विशेष म्हणजे कन्हान शहराकरीता एकही स्मशानभूमी नाही. कन्हान नदीच्या पलीकडच्या तिरावर नागरीक अन्त्यविधी करीत असतात. पावसाळ्यात अन्त्यविधीची समस्या फारच बिकट होते, ही समस्या तातडीने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे यावेळी खा.बर्वे श्यांनी सांगितले. 

    स्थानिक पत्रकारांनी पत्रकारभवन तसेच पत्रकार निवासाचा मुददा उपस्थित केला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण याकरीता तातडीने प्रयत्न करू असे सांगितले. शिवाय शहरातील पाणी समस्या, नागरिकांकरीता गार्डन, खेळायला मैदान, आठवळी बाजार ,जिम आदी मूलभूत समस्यांवर काम सुरू असल्याचे खा.बर्वे यांनी सांगितले. यावेळी‌ विशेष महत्त्व बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले, शिवाय कन्हान नगरपरिषदेच्या हद्दीतील शिहोरा पेपर मिल परिसरातील भूखंड एमआयडीसी करिता उपलब्ध झाल्याने कन्हान शहर सेंटरमध्ये असल्याने भौगोलिक दृष्टिकोनातून वाहतूक, पाणी, वीज सोयीचे असल्याने उद्योगधंदे मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात आणि परिसरातील गावांना याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो बर्वे यांनी पत्रकार परिषद संबोधित करत असताना सांगितलें की जे सत्ता असलेल्या सरकारमध्ये २५ वर्ष आमदारकी भोगत आहे त्यांनी आजपर्यंत जे केले नाही ते येत्या काही काळामध्ये पूर्ण होताना दिसेल जर पुढाऱ्यांची व सरकारी अधिकारींची इच्छा असेल तर कुठलेही काम न होण्यासारखे नाही.                

    परिषदेत पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम राहाटे, वरिष्ठ पत्रकार मालवीय गुरूजी, अजय त्रिवेदी, मोहन रंगारी, शांताराम जळते, जयंत कुंभलकर, दिनेश नानवटर, सुनिल सरोदे, कमलसींग यादव‌, आकाश पंडितकर व‌ कन्हान मराठी पत्रकार संघ उपस्थित होते. तसेच‌ यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार, सचिन पटले, मुनिंदा सुखदेवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

२५ सप्टेंबर ला शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन  शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुपवरूनही होणार लेफ्ट

Mon Sep 16 , 2024
२५ सप्टेंबर ला शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन  शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रशासकीय व्हाट्सअप ग्रुपवरूनही होणार लेफ्ट कन्हान,ता.१५     महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत (दि.१५) मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा (दि.५) सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta