नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ
न्यायालयाचे आदेश नसतांना बांधकाम सुरू प्रशासन झोपेत
कोरपना : मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत हद्दीतील सन 2017 -18 व्या वर्षात वैशिष्ट पूर्ण नगरोत्थान निधीअंतर्गत दोन कोटीचे 13 कामे सिमेंट काँक्रीट रस्तानाली बांधकामाकरिता एक कोटी 93 लक्ष निधीची कामे अंदाजपत्रक प्रशासकीय आराखडा मंजूर करण्यात आला. उपरोक्त निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावे यावरून भूषण इटनकर यांनी न्यायालयात धाव घेऊन तो निधी पंचायतीला वर्गकरावा विशेष हे नगरपंचायत अंतर्गत 28 कामे झाली असून चोवीस कामे एकाच कंत्राटदाराला देण्यामागे विशेष कारण असून सर्वच्या सर्व स्पर्धेच्या युगात कोणताही बिलो दर नाही, अंदाजपत्रके किमतीत सर्व कामे मागे नगरप्रशासन व पदाधिकारी यांच्या संगनमतातून सुरू असून सदर प्रकरणात न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना जी कामे वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत प्रस्तावित केली ही कामे वार्ड क्रमांक 1,वार्ड क्रमांक 4 , क्रमांक 8, वार्ड क्रमांक 11 पूर्वी झालेले कमी दाखवून आराखडा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी व शाखा अभियंता हे सांगतात. हा रस्ता आमच्या विभागाचा नाही लेआउट दिलेलं नाही मोक्यावरवर काम झालेली आहेत असे निर्दशनास आले .
कोणत्या का विभागाने कामे केली ही नोंद नाही तक्रारीच्या अनुषंगाने काम काम झाल्याचे दिसून येते याबाबत अनेक तक्रारी असतानासुद्धा नगर प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने न्यायालयाचे निर्देश व मुख्याधिकारी यांचे आदेश नसताना ठेकेदार काम सुरु कसा करू शकतो एक संशयाचा भाग असून ठेकेदार न्यायालयाचा अवमान करीत या आदेश पूर्वीच कामं करण्याची घाई का ? या बद्दल गावकऱ्यांमध्ये शंकानिर्माण झाले असून काही प्रभाग मध्ये एक नवीन पैशाचेही काम पंचायतीने केले नसल्याने गावामध्ये असंतोष वाढत आहे. कोरपना येथील समतोल नगर विकास कामाचा बट्ट्याबोळ होत असल्याचे निर्माण झाले आहे. अनेक तक्रारी नगर प्रशासन विरोधात असताना चौकशी करण्याचे प्रयत्न होत असताना दिसत नाही. मुख्याधिकारी तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, नियमबाह्य बांधकाम सुरू असताना प्रशासन अनभिज्ञ कसे अनेक तक्रारी नगर पंचायत कळे प्रलंबित असताना माहिती कशी काय नाही बदल शंका निर्माण होण्यास वाव आहे. पुर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी,ज्या वॉर्डाचा विकास झाला नाही त्या वार्डातील कामे तातडीने सुरू करावी अन्यथा नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्या विरोधात नगरपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक सय्यद सोहेल अली यांनी दिला आहे.