*भेसळ धान बियानाचा शेतकऱ्यांना बसला फटका *”पातरू” बियाणे कंपनीचे लाखो रुपयांचे धान पीक बरबाद- संजय सत्येकार
कन्हान ता.28 सप्टेंबर
पारशीवणी तालुक्यातील निलज भागातील शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील
धानाच्या शेतीसाठी कन्हान शहरातील स्वाती बीज भंडार
दुकानदार कडुन हैदराबाद येथील “पातुरु” बियाणे कंपनीचे “मनाली 777” केशव चकोले, भाऊराव चकोले, रामकृष्णा चकोले, मिताराम चकोले, सीताराम चकोले निलज येथील शेतकर्यानी पातुरू कंपनीचे धान बीज खरीदी करून धानाची व्यवस्थित लागवड केली. मात्र पिकातून काही दुसऱ्या जातीचे धान पीक वेळेचा आदीच बाहेर आले. ज्यामुळे शेतकरी गोंधळले ज्या धानाचा पिकाला येण्यास (निसवण्यास) आणखी एक ते दिड महिनाचा कालावधी बाकी आहे. त्यात हे काय नवीन प्रकार ? असे शेतकऱ्यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. आता पुढे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दुकानदाराच्या माध्यमातून कंपनीच्या प्रतिनिधीला या प्रकरणाची माहिती दिली. परंतु कंपनीचे प्रतिनिधीनी चाल-ढकल करत उडवा उडवीचे उत्तर देऊ लागले. ज्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर संजय सत्येकार शेतकरी नेते यांना ही हकीकत सांगितली. यावर सत्येकार यांनी तात्काळ शेतावर जाऊन पाहणी केली व कृषी अधिकाऱ्याशी चर्चा करून सर्वे करण्याची मागणी केली.या प्रकरणाची कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपावती मिळायला पाहिजे व दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करीत राज्या बाहेरील बियाणे कंपनीचे बियाणे विक्रीवर बंदी टाकावी.
आधीच शेतकरी फार अडचणीत आहे आणी शासनाचा काही अधिकाऱ्यांचा आशीर्वादाने असले कारनामे दिवसेन दिवस वाढत आहे. हे थांबायला पाहिजे या करिता अशा अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही होणे गरजेचे आहे असे संजय सत्येकार यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनात म्हटले आहे.