दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून कन्हान नदीन बुडुन मुत्यु  : कन्हान

दहा वर्षीय मुलाचा पाय घसरून कन्हान नदीन बुडुन मुत्यु 

कन्हान : – सिहोरा येथील रहिवासी आई, बहिण भाऊ कन्हान नदी काठावरच्या वाडीतील पालक, मेथी भाजीपाल्यास पाणी देताना १० वर्षीय नयन मेश्राम याचा पाय घसरून पाण्यात पडुन नदीत बुडुन त्याचा मुत्यु झाला. 

      प्राप्त माहिती वरून सिहोरा प्रभाग क्र ३ येथील रहिवासी उपजिविकेकरिता कन्हान नदी काठावर वाडी लावुन काकडी, डांगरू, पालक, मेथी व इतर भाजी पाल्याचे उत्पादन घेत असतात. बुधवार (दि.३०) ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान आई चंदा मेश्राम, बहिण श्वेता व नयन विनायक मेश्राम वय १० वर्ष तिघे कन्हान नदी काठावरील वाडीतील पालक, मेथी भाजीला पाणी देत होते.यात लहान भाऊ नयन चा पाय घसरून नदी पाण्यात पडुन बुडाल्याने आई व बहिणीने लोकांना मदती करिता बोलावित बहिणीने पाण्यात उडी घेत भावाचा शोधत खोल पाण्यात गेल्याने धावुन आलेल्या लोकांनी बहिणीला पाण्या बाहेर काढले आणि मुलाचा शोध घेत रात्र झाल्याने शोध थांबवुन गुरूवार (दि.१) ला सकाळी शोध मोहिम राबवुन १० वर्षीय नयन चा मुत्यु देह नदीतुन बाहेर काढुन कन्हान पोलीसांनी उपजिल्हा रूग्णालय कामठी ला श्वविच्छेदन करून दुपारी २ वाजता परिवारास सुपुर्द करित कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला.   

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कृषी खतात भेसळ प्रकरणी गोडाऊन सिल करून सखोल तपास सुरू :मोठी कार्यवाही

Fri Oct 2 , 2020
कृषी खतात भेसळ प्रकरणी गोडाऊन सिल करून सखोल तपास सुरू #) जि प अध्यक्षा व कृषी अधिका-यांची कार्यवाही.  कन्हान : –  नागपुर जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या उपस्थितीत कन्हान येथील नाका नंबर सात च्या कृषी खाद्य गोडाऊन मध्ये अचानक धाड टाकली असता कृषी खताच्या बो-या संशयास्पद आढल्याने रात्र झाल्याने कन्हान चे गोडाऊन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta