*दरोडा टाकण्याचा कट फासला..*
*दादाजी नगर येथील घटना.*
सावनेर:-येथील दादाजी नगर येथील वस्ती मध्ये रात्री च्या सुमारास एका नागरिकाच्या घरा भवतील अज्ञात चोरट्यानी सतत दोन तास पाहणी करत असलेल्या 4 ते 5 अट्टल चोरट्यां चा व्हिडीओ फुटेज घराचा सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला…
मिळालेल्या माहितीनुसार सावनेर पोलिसांना चोरट्या बाबत तक्रार नोंदवली असून प्रदीप बावनकर हे वे.को. लि.चा सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी असून यांच्या राहत्या घरी सी.टी. व्ही. कॅमेरे लावले आहेत त्या पैकी वाशिंग एरिया मधील कॅमेराची दिशा बदलल्याची त्यांना बदलून आढळून आल्याने त्यांच्या मनात संशय आल्याने त्यांनी तातडीने फुटेज बघितले असता काही बाबी दिसून आले..
दि.२२ सप्टेंबर २०२० ला १२.१५ च्या सुमारास २-३व्यक्ती बर्डे सरांच्या घराचा बाजूने येताना दिसून आले होते त्यांचा हाथा मध्ये टॉर्च फिरकावत असल्याचे दिसून येत होते..त्या नंतर थोड्या वेळाने एक व्यक्ती उभा होऊन घराच्या मागे जाताना दिसत होता यात त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे त्याच्या तोंडावर मास्क होते तो लपून वाकून भिंतीच्या साईड ने मागे जाताना दिसत आहे..
त्या नंतर थोड्या वेळाने त्यांच्या पैकी एक व्यक्ती मेन गेट च्या कॉलम जवळ उभा असून त्याच्या घराच्या मुख्य प्रवेश दरवाज्या बाजूला असलेल्या कॅमेरावर सतत टॉर्च मारताना दिसत होता तसेच बाजूला असलेल्या खाली प्लॅट वर काही व्यक्ती जवळ टॉर्च असल्याचे दिसून आले..नंतर २.३० च्या सुमारास प्रदीप बावनकर यांच्या घरा मागून रवी गायकवाड यांच्या घरा च्या बाजूला असलेल्या रोड वरून एका पाठोपाठ एक अशे सहा व्यक्ती जाताना दिसून आले..हे सर्व व्यक्ती डॉ.विश्वास यांच्या घरा कडे जाताना दिसून आले.. या नंतर
प्रदीप बावनकर याच्या घरी चोरी करण्या करिता गेलेले हे सर्वे चोरटे मानकर यांच्या शेताला असलेले लोखंडी जाळीचे कुंपण तोडलेले दिसून आले.दि.०७ सप्टेंबर रात्री १२ च्या सुमारास व रात्री १४ सप्टेंबर २०२० च्या १.३० च्या सुमारास काही चोरटे टॉर्च घेऊन रेकी करीत असल्याचे दिसून आले..२२ सप्टेंबर २०२० ला सहा चोरटे सलग ३ तास काय करीत होते हे समजेनासे झाले आहे कदाचित यांचा मोठा दरोडा घालण्याचा प्रयत्न असावा परंतु तो ईशवराच्या कृपेने टळला.