सावनेर : दिनांक 29/10/2020 रोजी ठाणेदार सुरेश मट्टामी यांना मुखबिराद्वारे खबर मिळाली की , पांढुर्णा ते नागपूर जाणा – या हायवे रोडनी 10 चक्का कन्टेनर क्र . पी बी 08 बी – एन 5277 मध्ये अवैध्यरीत्या कतलीसाठी गौवंशाची वाहतुक केली जात आहे . अशा खबरे वरून ठाणेदार सुरेश मट्टामी , पो उप नि अर्जुन राठोड , ना पोशी राजेन्द्र मनोहरराव रेवतकर ब.नं. 1244 नापोशी रविंद्र चटप बन 1914 , चालक नापोशी गुणवत्ता डखोळे बन 1930 पो शी सचिन येळकर बन 2339 हो.सै. रोशन झाडे सनद क्र . 1788 , हो.सै. महेन्द्र भोयर सनद क्र 4121 , हो . सै . नानुसाव राऊत सनद क्र . 4115 चे सह पांढुर्णा हायवे रोड क्र 47 वरील उमरी गावाजवळ नाकाबंदी लावुन वाहन चेकींग करीत असतांना दिनांक 29/10/2020 चे दुपारी 13/30 वा . दरम्यान एक 10 चक्का कन्टेनर क्र . पी बी 08 बी एन 5277 हे वाहन पाढुर्णा हायवे रोडनी उमरी गावा कडे येतांना दिसले . वाहन चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता चालकाने आपल्या ताब्यातील वाहन नाकाबंदीचे ठिकाणी न थांबविता नागपूरच्या दिशेने हायवे वरील जानार्या येणा – या वाहणाना व लोकांना धोका निर्माण होईल ईतक्या बेगाने निष्काळजी व बेदारकपने पळवु लागला त्याचा सरकारी वाहनाने पाठलाग सुरु केला .
सदर ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हायवे क्रं . 47 ने बिहाडा फाटयावरुन भागेमाहरी , हेटी व सावनेर बायपासने सावनेर मध्ये प्रवेश केला सावनेर मधील पोलीस स्टेशन समोर लोकांची गर्दी असल्याने सदर वाहन चालकाने वाहणाची गती कमी केली असता आम्ही सरकारी वाहन सदर कन्टेनर च्या समोर घेवुन वाहन थांबवुन स्टॉप च्या मदतीने वाहन चालकास व त्याच्या दोन साथीदारास ताब्यात घेवुन त्या तीघांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव
1 ) गोलु उर्फ गोविंद खुमानसिंग लोधी वय 28 वर्ष धंदा -ड्रायव्हर रा . वार्ड क्र . 1 नरेपूरा जि.रायसेन ( मध्य प्रदेश )
2 ) अफझल रहीस कुरेशी वय 38 वर्ष रा , जिनसी चीराया जहागीराबाद भोपाल ( मध्य प्रदेश ) धंदा मजुरी
3 ) लुकमान चाँद खान वय 19 वर्ष रा . अशोक गार्डन हरी मादार जवळ भोपाल ( मध्य प्रदेश ) धंदा मजुरी असे सांगीतले . स्टॉपच्या मदतीने वाहनाची पाहाणी केली असता सदर वाहनाचे मागील डाल्याचे खाली वर दोन कप्पे तयार करुन त्यामध्ये एकुण 54 नग बैल गोरे गौवंश जीवंत व 2 नग बैल गोरे गौवंश मरण पावलेल्या अवस्थेत दिसले . सदर गौवंश जनावरे ही अत्यंत क्रुर व निर्यदयतेने डावून , आखुड दोरीने बाधून चारा पाणी न देता अपु – या जागेत दाटीवाटीने कोळुन जनावरांना त्रास होईल अशा स्थितीत अवैध्यरीत्या कत्तलीसाठी घेवुन जातांना मिळुन आले . आरोपीतांकडे सदर जावरांची वाहतुकीबाबत वाहतुक परवाना व खरेदी पावती बाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे सांगीतले तसेच सदर जनावरे ही सागर मध्यप्रदेश येथुन वाहन मालक आमीर रईस कुरेशी वय 35 वर्ष रा , न्यु रविदास कॉलनी जिनसी चौराया जहागीराबाद भोपाल ( मध्य प्रदेश ) व सलमान रईस कुरेशी वय 25 वर्ष रा , न्यु रविदास कॉलनी जहागीराबाद भोपाल ( मध्य प्रदेश ) याने खरेदी करून आदलाबाद आध्रप्रदेश येथील मंडईत विक्री साठी घेवुन जाण्यास सांगीतल्याचे सांगीतले .
सदर जनावरांची वाहतुक ही कत्तली करीता होत असल्याचे आमची खात्री झाल्याने दोन पंचाना बोलावुन त्यांचे समक्ष पंचनामा कार्यवाही करुन गौवंश व वाहन ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या मालाचे वर्णन 1 ) 54 नग जिवंत बैल गोरे गौवंश प्रत्येकी 10,000 / -रुपये प्रमाने 5,40,000 / -रुपये 2 ) 2 नग मृत बैल गोरे गौवंश किमती 00 / रुपये 3 ) 10 चक्का कन्टेनर क्र . पी बी 08 बी -एन 5277 किमती 15,00,000 / -रुपये असा एकुन 20,40,000 / – रुपयाचा माल मिळुन आल्याने सविस्तर मोका पंचनामा कार्यवाही करुन वाहनामधील गौवंश जनावरे पुढील देखभाल व उपचारा करीता गौ विज्ञान अनुसंधान केन्द्र देवलापार जि.नागपूर येथे जमा करण्यात आले . व वाहन पोलीस स्टेशनला आणुन जमा करण्यात आले आहे . नमुद वाहन चालक व त्याचे साथीदार यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन केळवद अप क्र .226 / 2020 कलम 429 , 279,109,34 भादवी सह कलम 11 ( 1 ) ( घ ) ( ड ) ( च ) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतीबंधक अधि . 1960 सह कलम 5 ( अ ) , 9 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनीयम 1995 सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 सहकलम 192 ( अ ) , 179,184 मो वा का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो उप नि अर्जुन राठोड पोलीस स्टेशन केळवद हे करीत आहेत . सदरची कार्यवाही ही मा . श्री राकेश ओला , पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , मा.श्री राहुल माकणीकर अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रा . , मा , श्री अशोक सरबंळकर , उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेश मट्टामी , पो उप नि अर्जुन राठोड , ना पो शी राजेन्द्र रेवतकर बन 1244 , ना पो शी रविंद्र चटप ब न 1914 , पो शी सचिन येळकर ब न 2339 , चालक नापोशी गुणवंता डाखोळे बन 1930 हो.सै. रोशन झाडे सनद क्र .1788 , हो.सै. महेन्द्र भोयर सनद क्र . 4121 , हो . सै . नानुसाव राऊत सनद क्र . 4115 यांनी केली आहे .