जय दुर्गा भजन मंडळाने केली निराधार जेष्ठ चिंधुजी चापले यांची चौदवी
कन्हान : – जेष्ठ निराधार चिंधुजी चापले हे कसेतरी जिवन जगत असताना प्रकृती खराब होऊन उपचारा दरम्यान शासकिय रूग्णालय नागपुर येथे त्याचा मुत्यु झाला. त्याचे कुणीही नातेवाईक नसल्याने कन्हान पोलीसांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. संताजी नगर कांद्री येथील जय दुर्गा भजन मंडळा व्दारे भजनाच्या कार्यक्रम व अल्पोहारा सह निराधार जेष्ट चिंधुजी चापले यांचा चौदवी कार्यक्रम संपन्न केला.
जय दुर्गा मंदीर संताजी नगर कांद्री परिसरात कित्येक वर्षा पासुन जेष्ठ नागरिक चिंधुजी चांगोजी चापले वय ८५ वर्ष हे भिक्षा मागुन कसेतरी आपले जिवन जगत असताना दि.१ डिसेंबर ला त्याची प्रकृती खराब झाल्याने तेथील नागरिकांनी ग्रा प सदस्य सौ अरूणा हजारे, मनोज वडे यांच्या सहकार्याने प्राथमि क आरोग्य केंद्र कन्हान ला उपचाराकरिता नेले असता प्रकृती जास्त असल्याने शासकीय रूग्णालय नागपुर येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान (दि.२) डिसें बर ला त्यांचा मुत्यु झाला. त्यांचे नातेवाईक नसल्याने कन्हान पोलीसांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. दुर्गा मंदीर संताजी नगर कांद्री परिसरात ते राहत असल्याने येथील जय दुर्गा भजन मंडळा व्दारे (दि.१५) ला दुर्गा मंदीरात भजनाचा कार्यक्रम करून उपस्थितांना अल्पो हार वितरण करित जेष्ठ नागरिक चिंधुजी चापले यांचा चौदवी कार्यक्रम साजरा करण्यात आला. परिसरातील गजानन वडे, कवडु नामदेव बारई, भगवान लांजेवार, चिंधुजी पुंडेकर, शेषराव आखरे, पुसाराम कामडे, विठ्ठ ल पुंड, कवडु ढाले, दिनबाजी ठाकरे, कवडु आखरे, पुष्पाबाई झोडावणे, विमलबाई बोरकर, येणुबाई वाघा डे, रायवंताबाई भोंडे, सुगंधाबाई बारई, वदंनाबाई मेश्राम, चंद्रकलाबाई सारवे, शोभाबाई बावणे आदी जय दुर्गा भजन मंडळाच्या सदस्यानी सहकार्य केले.