प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात

प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात*

*पहिल्या चरणात आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन*
सावनेरः कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केन्द्र सरकार व राज्य शासनाने कोवीड़ 19 लसिकरणास  देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारी पासुन सुरुवात झाली असून देशाचे पंतप्रधान यांनी देशस्तरावर याची सुरुवात केली असुन सदर लसीकरणाच्या पहिल्या चरणाची सुरुवात प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,प्रभारी तहसीलदार चैताली दराडे,पंचायत समिती सावनेरचे गट विकास अधिकारी अनिल नागने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ,डॉ भुषण सेंबेकर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.16 जानेवारीला 100 आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
कोवीड़19 लसीकरण मोहिमेचे हे पहिले चरण असुन संपूर्ण जिल्ह्यातील 13 आरोग्य केन्द्रावरुन सुटीचे दिवस वगळता दररोज 100 आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आरोग्य सेवक,आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग व पन्नास वर्षावरील संशयीतांना आँनलाईन पध्दतीने लसीकरण करण्यात येणार असुन पुढील चरणाची सुरुवात केन्द्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशावरुण होण्याची शक्यता आहे.
याप्रसंगी जिल्हा स्तरिय पर्यवेक्षक स्नेहल मेन्ढे,डॉ. भुषण सेंम्बेकर,डॉ. प्रितम निचट,तालुका सहा.आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने,डॉ. ईसरत,डॉ. शुभ्रा,श्रीमती ऐटे,प्रामुख्याने उपस्थित होते.
तर सदर कोवीड़ 19 लसीकरण मोहीमेच्या यशस्वीते करिता आरोग्य विभागाचे कर्मचारी गुणवंत ठाकरे,प्रणय कोरडे,घनश्याम तुर्के,प्रकाश धोटे,योगीता लांजेवार, मंजुषा भगतवार,प्रतिभा लांजेवार आदिना नियुक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वराडा शिवारात अनोळखी मुतदेह झाडाला गळफास लागलेला मिळाला   

Tue Jan 19 , 2021
वराडा शिवारात अनोळखी मुतदेह झाडाला गळफास लागलेला मिळाला  कन्हान : – नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गा लगत वराडा शिवारात एमएचकेएस पेंट्रोल पंम्प सामोर नवनिर्माण जैन मंदीर परिसरात एका अदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह झाडाला गुलाबी दुपटयानी गळफास लावलेल्या असल्याची माहीती सोमवार (दि.१८) सकाळी कन्हान पोलीसाना माहीती मिळताच कन्हान पोलीस स्टेशनचे हे कॉ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta