गहुहिवरा रोड वर दोन जिवघेणे गड्डे अपघातास निमंत्रण
कन्हान : – तारसा रोड वरील रेल्वे क्रॉसींग वर उडाण पुलाचे काम सुरू असुन या रसत्याची जड वाहतुक गहुहिवरा रोडने वळविण्यात आल्याने या रोड वर दोन मोठे जिवघेणे गड्डे पडलेले असल्याने दुचाकी, चारचा की वाहनाचे चाक गड्यात जावुन अपघातास निमंत्रण देत आहे.
नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गावरील तारसा रोड चौकातुन तारसा मौदा कडे जाणा-या तारसा रोड रेल्वे क्रॉसींग वर उडाण पुलाचे काम सुरू असल्याने जड वाहतुक आदीवासी शहीद चौकातुन चारपदरी बॉ यपास, गहुहिवरा, चाचेर कडे जाणा-या गहुहिवरा रोड ने सुरू असुन आनंदनगर, शंकर नगर वळणाजवळ सांडपाण्याच्या मोठया नालीचे वरचे स्लाप फुटुन मोठा गड्डा पडलेला आहे. याच रोडवर पुढे नागपुर बॉयपास चारपदरी रस्त्या अंडर पुलाच्या सामोर सत्संग चौक ज वळ गहुहिवरा रोड खालुन नहराचे पाईप फुटुन मोठा गड्डा पडलेला आहे. हे दोन्ही गड्डे मोठे व उघडे आणि सुरक्षा फलक नसुन रसत्या लगतच असल्याने दुचाकी, चारचाकी वाहन जात असताना सामोरून मोठे वाहन आल्यास रस्त्या खाली वाहन उतरताना किंवा असे ही हे गड्डे दिसत नसल्याने वाहनाचा अपघात होत असतो. दिवसेदिवस हे गड्डे मोठे होत असुन या रस्त्याची देख भाल करणारे अधिकारी गाढ झोपेत दिसत आहे. आं नदनगर, शंकर नगर जवळील सांडपाण्याची नालीचा गड्डा संबधित विभागाने त्वरित बंद करून दुरूस्त करा वा तसेच सत्संग चौकातील नहराची नालीची फुटलेली पाईप त्वरित पटबंधारे विभागाने दुरूस्त करावी. याच गहुहिवरा रोडने पहाटे सकाळी व सायंकाळी कन्हान, कांद्रीचे नागरिक दररोज पायदळ फिरून व्यायाम करि त असतात. या दोन्ही गड्या विषयी संबधित विभाग व अधिका-यांना नागरिकांनी कळवुन सुध्दा दुर्लक्ष करित असल्याने मोठे अपघात होऊन लोकांचे जिव गेल्या वरच हे अधिकारी गड्डे दुरूस्त करतील का ? अश्या चर्चेला ऊत येत आहे.