*पारशिवनी आठवडी बाजारात पोलिस उपस्थित असताना बाजारात मोठी गर्दी उसळणे अर्थात प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष का?*
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
पारशिवनी (ता प्र):- पारशिवनी येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरविण्यात येते. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २00५ चे कलम ३0 व ३४ अन्वये अधिकाराचा वापर करून कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात सर्व शाळा महाविद्यालय संस्था व इतर तत्सम संस्था विद्यार्थ्यांची तासिका घेण्यात १४ मार्च २0२१ पयर्ंत प्रतिबंध घालण्यात आले आहे. तसेच जिल्हा तील ग्रामीण भागातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, पारशिवनी येथील प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे येथील दि. (८मार्च) सोमवारी आठवडी बाजारात मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.
यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी तहसील कार्यालय पारशिवनी सभागृह येथे कोरोनाविषयक तातडीची बैठक घेतली. यावरून पारशिवनी चे तहसीलदार वरूण कुमार सहारे, मुख्यअधिकारी अर्चना वंजारी यांचे पुरेपूर दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखविल्याचे सिद्ध होते, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. आज नागरिक बिना मास्कशिवाय बाजारात घुमतानी दिसून आले. जनतेनी शासना बरोबर स्वत:ची जिम्मेदारी पाडावी, असे आवाहन मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी केले कोविड-१९ नियमांचे उल्लंघन केल्यास सामान्य नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मग, अशा आठवडी बाजारात पोलिस उपस्थित असताना बाजारात मोठी गर्दी उसळणे अर्थात प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष का? असा सवाल सुज्ज्ञ नागरिकांचा व पाराशिवनीकरानी केला आहे.