* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या उपक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद*
*जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धांचे निकाल जाहिर…*
*कन्हान*: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषद नागपूर मधील सर्व महिला शिक्षिकांकरिता 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्याने ,स्वरचित काव्यवाचन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा अशा विविध प्रकारात डिजीटल पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.यात जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षिकांनी आपला सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण व्हिडिओ, फोटो च्या माध्यमातून केले.स्पर्धेनंतर प्रत्येक स्पर्धेचे परिक्षण बाह्य यंत्रणेकडून त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून करण्यात आले असून नुकतेच निकाल जाहिर करण्यात आले.
वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत
प्रथम सौ.संध्या दळवी पं स उमरेड,द्वितीय सौ.अनिता मुने पं.स.रामटेक,तृतीय सौ. मृणालिनी खुरगे/भाकरे पं.स.कामठी,तथा
सौ.कृपाली सुर्यभानजी वैद्य/वाघमारे पं.स.नरखेड, प्रोत्साहनपर सौ.रजनी लाडेकर पं.स. रामटेक,नलिनी ठाकरे पं.स. पारशिवनी
‘वक्तृत्व स्पर्धेत’
प्रथम कु.कृपाली सुर्यभानजी वैद्य पं.स.नरखेड,द्वितीय सौ.अमृता शिंदे पं.स.रामटेक,तृतीय सौ.संगीता नंदनवार पं.स. नरखेड प्रोत्साहनपर सौ.निलीमा राऊत पं.स. कळमेश्वर व सौ.रेखा वसंतराव हरले पं.स. काटोल
रांगोळी स्पर्धेत
प्रथम सौ.सुनयना लेनगुरे पं.स.पारशिवनी,द्वितीय सौ. रोशनी मंडलिक ,प स सावनेर,तृतीय कु.कृपाली सुर्यभानजी वैद्य ,पं स नरखेड प्रोत्साहनपर सौ. मनिषा चौधरी पं स नागपूर,व सौ.वर्षा लष्कर चव्हाण,पं स रामटेक
‘निबंध स्पर्धेत प्रथम कु. मीनाक्षी गायकवाड पं स नरखेड द्वितीय सौ. मनिषा सुभाष रोडकर प स रामटेक,तृतीय सौ. निलीमा राऊत, पं स कळमेश्वर
प्रोत्साहनपर. स्वाती हितेश चव्हाण,प स मौदा
व सौ.सुषमा शेषराव वाघमारे, प स नागपूर
स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत.प्रथम सौ.गौरी बांगरे ,पं स पारशिवनी द्वितीय सौ. निलीमा राऊत,पं.स.कळमेश्वर, तृतीय सौ. निशा दिलीपराव भक्ते , प स नरखेड,प्रोत्साहनपर वैशाली संजय बोरेकर व सौ. वनमाला मुंगभाते,प स नरखेड आदींनी यश संपादन केले.
कोवीड 19 परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर सर्व विजयी स्पर्धकांना समारंभपूर्वक प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार तथा सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक सहभाग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.
स्पर्धेतील सर्व यशस्वी व सहभागी भगिनींचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे गोपाळराव चरडे,रामु गोतमारे,सुनिल पेटकर, सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी ,धनराज बोडे,आनंद गिरडकर, गजेंद्र कोल्हे,अशोक बावनकुळे,विरेंद्र वाघमारे,पंजाब राठोड,लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभकाटे ,अशोक डोंगरे,उज्वल रोकडे,प्रकाश बांबल,संजय शिंगारे,अनिल दलाल,मनोहर बेले,जागेश्वर कावळे,भोलेश उईके,संजय घारपुरे,अशोक हटवार,राजेश मथुरे विजय बिडवाईक, आशा झिल्पे,सिंधू टिपरे,वंदना डेकाटे,सुनंदा देशमुख,नंदा गिरडकर, श्वेता कुरझडकर आदींनी अभिनंदन केले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता अखिल नागपूर महिला सेल च्या पदाधिका-यांनी विशेष परिश्रम घेतले.