शिवाजी चौक पारशिवनी येथे अपघातामुळे गांजा तस्करी उघडकीस; आरोपी अटकेत,३लक्ष,३३ह्जार,१८०रूपये चा गांजा सहमुद्देमालजत्त,पारशिवनी पोलिसांची कामगीरी

*शिवाजी चौक पारशिवनी येथे अपघातामुळे गांजा तस्करी उघडकीस; आरोपी अटकेत,३लक्ष,३३ह्जार,१८०रूपये चा गांजा सहमुद्देमालजत्त,पारशिवनी पोलिसांची कामगीरी

*पारशिवनी*(ता प्र):-आमडी फाटा मार्गाने पारशिवनीत मध्यप्रदेशवरून येत असताना शिवाजी चौकात दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला २३ किलो ३१८ ग्राम गांजा ची पार्सल भर रस्त्यात पडल्यामुळे गांजातस्करी उघडकीस आली. घटना शनिवारी (२७ मार्च) सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडली.आरोपी औमकारदास घनश्यामदास बैरागी,वय ३३वर्ष ,,राहणार नरहरा ,तालुका उदयपुरा ,जि. रायसेन (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मनसर येथे मध्यप्रदेशातून २३.३१८ किलो गांजा घेऊन औमकारदास बैरागी हा आपल्या दुचाकीने आला असताना त्याने मध्यप्रदेशातील आपला मित्र संतोष जिवनदास बैरागी (वय २४, रा. पिपरिया याला मनसर येथे बोलून घेतले. दोघेही मनसरवरून पारशिवनी मार्गावर येत असताना मार्गावर मौजा शिवाजीचौक येथे असल्याने दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी डिवाडरवर आदळलयाने स्लिप झाली यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. त्यातच त्यांच्याकडे असलेला दोन पार्सल पाकीट गांजा अंदाजे किंमत २ लाख,३३हजार,१८० रुपये रस्त्यावर पडला. अपघताची माहितीउभे लोकानी पारशिवनी पोलिसांना दिली ,पराशिवनी पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे,पोलिस उपनिरिक्षक संदिपान उबाळे,मुद्दस्सर जमाल,संदिप कडु,रोशन काळे,कौशिक अंसारी
सह पोलिसाचा ताफा घटनास्थळावर दाखल झाले. व मोटर सायकल ,व गांजा पार्सल दोन काळे रंगाची बॅग व एक पॅलाविस्टक पिसवी चा पंचनामा करुन जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी हा गंभीररित्या जखमी असल्याने त्याला इंदिरा गांधी हॉस्पिटल, नागपूर येथे पाठविण्यात आले. तर दुसरा आरोपीला पारशिवनी पोलिसांनी अटक केली. घटना ची माहीती फिर्यादी पोलिस नायक संदिप कडु ०दारे दिली तक्रारी नुसार पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमांक ६५/२१नुसार नोंद करून कलम २०,२९,एन डि पि एस (नार्गी)नुसार दाखल करून आरोपी ओमकारदास घनश्यामद्रास बैरागी,याना अटक करून गाजा पार्सल पिसवी २३किलो ३१८ग्राम किमत २लक्ष ३३हजार १८०रुपये,व बिना नंम्बर ची काळी पल्सर मोटार सायकिल किमत १लक्ष रूपये असे एकुण ३लक्ष ३३ह्जार १८०रूपये चा मुद्देमाल जप्तकरून पुढील तपास पारशिवनी पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक संदिपान उबाळे,पो ना मुदुस्सर जामल,संदिप कडु,रोशन काळे, कौशिक अंसारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती पारशीवनी यांच्या वतिने समाज प्रबोधनात्मक धुलिवंदन महोत्सव संपन्न

Mon Mar 29 , 2021
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती पारशीवनी यांच्या वतिने समाज प्रबोधनात्मक धुलिवंदन महोत्सव संपन्न* कमलसिंह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था व वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा होळी धुलीवंदन महोत्सव covid-19 या नियमाचे पालन करून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta