शिवशक्ती आखाडा बोरी व्दारे रक्तदान शिबीरात ४५ युवकाने केले रक्तदान
#) रक्तदानाने नर सेवा हिच नारायण सेवा होय.
कन्हान :- देशातील कोरोना महामारीची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांना होणारी रक्ताची🩸 कमतरता भासत असल्याने आज रक्तचं अमुल्य महत्व वाढलेले असल्याने सामाजिक बांधिलकीतुन समाजात रक्तदाना विषषी जनजागृती करण्यास शिवशक्ती आखाडा व्दारे बोरी (सिंगारदिप ) गावात आयोजित रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यानी रक्तदान केले.
कोरोना विषाणु आजाराची भयावह परिस्थितीने रूग्णालयात रूग्णाना रक्ताचा पुरवठा करण्यास करत रता बघता (दि.२९) गुरूवार ला शिवशक्ती आखाडा व्दारे बोरी (सिंगारदीप) गावात आयोजित रक्तदान शिबिराचे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेस निलेश भाऊ गाढवे व कॉमरान भाऊ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्तदान🩸शिबिराची सुरुवात करण्यात आली. टीम बा रायगड चे श्रीधर भाऊ वडे वं टीम, राजे ग्रुप कन्हानचे केतन भाऊ भिवगडे, रितेश दादा जनबंधु यांच्या उपस्थितीत ४५ रक्तदात्यानी रक्तदान केले. मार्गदर्शक निलेश भाऊ गाढवे, अली ग्रुप चे अध्यक्ष कॉमरान भाऊ व लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने शिबीर सुरळीत व योग्य रित्या पार पडले. सर्व बोरी गावातील तरूण मुलांचे समाजा प्रति प्रेम आणि मदतीची भावना दाखवित एक पाऊल समाजासाठी हे धोरण आत्मसात करून रक्तदान🩸 शिबिरात सहभाग घेऊन अमुल्य असं रक्तदान केल्या बद्दल शिवशक्ती आखाडा बोरी परिवारा व्दारे आखा डा प्रमुख कु पायल येळणे हीने सर्वाचे आभार व्यकत केले.