सार्वजनिक वाचनालय कन्हान चा स्थापन दिन साजरा
कन्हान : – सार्वजनिक वाचनालय हनुमाननगर कन्हान येथे कोविड-१९ नियमाच्या अधिनस्त राहुन १ मे महा राष्ट्र दिवस, कामगार दिवस व वाचणालय स्थापना दिवस छोटेखानी कार्यक्रमाने साजरा करण्या त आला.
कोरोना च्या पार्श्वभुमिवर शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करित कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंन्द्र गिरडकर आणि प्रमुख अतिथी दिनकरराव मस्के यांचे हस्ते रविंद्रनाथ टागोर व सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री विठ्ठलराव नाईक साहेब यांचा प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करित सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री श्याम बारई यांनी वाचनालयाचा प्रगताचा अहवाल व महाराष्ट्र राज्य निमिर्ती करिता शहिद झालेल्या १०६ वीर जवानांची आठवण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमि त्य माहिती देण्यात आली. अल्पोहार वितरित करून वाचणालयांचा स्थापना दिन थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य प्रकाशराव नाईक,सचिव मनोहर कोल्हे, सदस्य अल्का बाई कोल्हे सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई यांनी तर आभार कृणाल कोल्हे यांनी मानले.