*तालुक्यात संचारबंदी दरम्यान बिनाकारण फिरणा-याची रस्तायावरच RT PCR चाचणी.पोलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांची माहीती*.
*पाराशिवनी* (ता प्र):-पोलिस स्टेशन, महसुल विभागा, नगर पंचायत व आरोग्य विभाग
पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने धडक मोहीम राबवून विनाकारण फिरणार्यांविरुद्ध शिवाजी चौक ,बजार चोक पाराशिवनी येथे मंगलवार १८ मे पासून जागेवरच आरटीपीसीआर टेस्ट करून ५८ जणांचे टेस्टसाठी नमुने घेतले आहे. नमुने घेतले हे नमुने प्रयाोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यामध्ये कोरोना प्रादरुभाव आढळल्यास त्याच्यावर शासकीय कोविड सेंटर मध्ये उपचार करण्यात येणार असल्याचे तहासिलदार.,ठाणेदार ,मुखअधिकारी ,आरोग्य अधिकारी यांनी सयुक्तरित्या सांगितले.
कोरोना विषाणुचा संसर्ग राज्यासह प्रत्येक जिलमध्ये झपाट्याने वाढत आहेत. मागील वर्षी पहिल्या लाटेनंतर फेब्रुवारी महिन्यापासून दुसरी लाट आली. आणखी तिसरी लाट येण्याचे संकेत वैद्यकीय तज्ज्ञानी दिले आहेतच. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत असताना व संचारबंदी लागू असताना मात्र विनाकारण बाहेर फिरून कोरोनाचे नियम मोडणार्याची संख्या वाढतच आहे. हे लक्षात घेता तहासिलदार, पोलिस स्टेशनचे ठाणेदार ,मुख्यअधिकारी ,वेद्याकीय अधिकारी यांनी सोमवारपासून
येथे फिक्स पाँईट तयार करून मास्क न वापरणारे व विनाकारण फिरणार्यांविरुद्ध धडक कारवाई करून ५८ जणांचे आर टी पी सी आर साठी नमुने घेतले हे नमुने प्रयाोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, यामध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्यावर शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहे. पोलिसांच्या ऑन दि स्पॉट तपासणी मोहीमेमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांचे धाबे दणाणले असून, यापुढे ही मोहीम नियमित राबविल्या जाणार असल्यामुळे आता विनाकारण फिरणार्यांनी खैर नाही, असा इशारा ठाणेदार यांनी दिला आहे.
पाराशिवनी शहरामध्ये रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कोरोना खबरदारी नियमाचे पालन प्रत्येक नागरिकांनी काटेकोरपणे करावे. कोणतीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टेस्ट करावी व आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहान पाराशिवनी शहराच्या तहासिलदार,पोलिस निरिक्षक, मुख्याधिकारी , वेद्याकिय अधिकारी यांनी संयुक्तरित्या आव्हान केले आहे.