भूमिगत नालीतील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर,आनंद नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कामठी : नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आवासीय परिसर आनंद नगर येथील भूमिगत नाली चोक अप झाल्याने नाली चे दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गँभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घाण पाण्यात मच्छरांचा प्रकोप वाढल्याने स्थानीय नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आहे
कामठी नगर परिषद अंतर्गत प्रभाग 15 मधील आनंद नगर रामगढ भागात कामठी नगर परिषद ने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाणी जाण्यासाठी भूमिगत नाली चे निर्माण केले परंतु या भूमिगत नाल्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून उपसा करण्यात आला नाही त्यामुळेच दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावर वाहत आहे या बाबत गेल्या दोन महिन्या पासून नगर परिषद मुख्याधिकारी संदिप बोरकर यांना लेखी तक्रारी देण्यात आल्या परंतु कोरोना प्रादुर्भाव कारण सांगून चाल ढकल करण्यात आली
घाण पाण्यात वराहांचा मुक्त संचार असल्याने संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे
कामठी नगर परिषद प्रशासना ने पावसाळ्यापुर्वी चोक अप झालेली भूमिगत नाली ची दुरुस्ती करून लवकरात लवकर या गँभीर समस्येचे निराकरण करण्याची मागणी या परिसरातील नागरिक राणी देशभ्रतार,विमल बघेल,पंचशीला खरोले,भारती कनोजे,शितल सोनवणे,सविता टेकाम,अंजुम परवीन,शगुफ्ता निखत,राधा मेश्राम,जियालाल बर्वे,मोतीराम भोंडेकर,जयपाल मोहबे,राजहंस वैद्य,मुकेश मालाधरे आदी नागरिकांनी केली आहे.
४ ते ५ वेळा कामठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांना या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लिखित निवेदन दिले परंतु हेतुपुरस्सर परिसरातील दलितांना त्रास दिला जातोय.
-सौ संध्या रायबोले, नगरसेविका प्रभाग १५