शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणा-या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणा-या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी गावात एमइसीबी विधृत बिलाची वसुली करिता गेलेल्या महिला कर्मचा-यास अश्लील शिवीगाळ करून काठी घेऊन अंगावर धावुन शासकीय कामात अडथळा करणा-या दोन ़आरोपी विरूध़्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे. 

  1.        प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.२४) जुन २०२१ ला फिर्यादी अनीता भिमराव कोतरे वय ४२ वर्ष राह.  खापरखेड़ा या एमएससीबी इलेक्ट्रीक वसुली करिता गेली असता आरोपी १) अशोक पिलाजी पाटील २) प्रवीण अशोक पाटील दोन्ही राह. टेकाडी यांनी अश्लील शिवीगाळ करून धक्का-मुक्की करित अंगा वर लाकडी काठी घेऊन धावुन आल्याने शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी फिर्यादी अनीता भिमराव कोतरे यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ३५३ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर आरोपीतांचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात खुशाल रामटेके हे करीत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने  

Mon Jun 28 , 2021
ओबीसी आरक्षण सपंवणाऱ्या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात कॉग्रेसचे निदर्शने कन्हान : – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधुन कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक कन्हान ला ओबीसी आरक्षण संपविण्या-या कारस्थानाने मोदी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आले.               शनिवार (दि.२६) जुन २०२१ ला आबेंडकर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta