वराडा शिवारात महामार्गावर महिलेची बॅग हिसकुन आरोपी पसार

वराडा शिवारात महामार्गावर महिलेची बॅग हिसकुन आरोपी पसार

#) बँग मध्ये असलेले २८,७०० रूपयाचा मुद्देमाल लुटुन आरोपी पळला. 

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर मनसर महामार्गावरील वराडा शिवारातील बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने फिर्यादी च्या गाडी मागे येऊन पत्नीच्या बॅग हिस्कावुन एकुण २८,७०० रुपयाचे सामन, पैसे व कागदपत्रासह घऊन पळुन गेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरुन कन्हान पोलीसांनी  अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू केला आहे. 

       प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२) जुलै २०२१ चे रात्री १०:३० ते १०:४० वाजता दरम्यान फिर्यादी बबलु तुलाराम सोनकुसरे वय ३२ वर्ष राह. रामटेक हा नागपुर सासुरवाडी येथुन पत्नी व मुलीसह रामटेकला जात असतांना एका अनोळखी ऐव्हंचर मोटार सायक ल काळ्या रंगाच्या दुचाकीवर बसुन एक काळ्या रंगा चा शर्ट घातलेला व लांब केस असलेल्या आरोपीने बबलु सोनकुसरे यांच्या अँक्टीवा दुचाकी गाडीच्या मागुन येऊन गाडीला लात मारून पत्नीच्या खांद्या वरील लेडीज बॅग हिसकावुन पळुन गेला. बॅग मध्ये नगदी ८००० रुपये, दोन ग्राम सोन्याची मनी किंमत ९,७०० रुपये, चांदीचे पायल ३,००० रुपये व एमआय कंपनी चा मोबाईल किंमत ८,००० रुपये असा एकुण २८,७०० रुपयाचे सामन, पैसे व कागदपत्रा सह घेऊन पळुन गेला. सदर प्रकरणी फिर्यादी बबलु तुलाराम सोनकुसरे यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ३९२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु असुन  पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरी क्षक जावेद शेख हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्ट्रीट लाईट चे बिल शासनानेच भरावे : सरपंच परिषदे ची मागणी

Sun Jul 4 , 2021
स्ट्रीट लाईट चे बिल शासनानेच भरावे… सरपंच परिषदे ची मागणी…. सरपंच परिषदे चे खंडविकास अधिकाऱ्याला निवेदन सादर… —————————————- सावनेर ता : ग्रामीण भागातील पथदिव्यांचे (स्ट्रीट लाइट) विद्युत बिल पुवीँपासुन शासनाकडून भरल्या जात होते.परंतु २३ जुन रोजी शासनाने परिपत्रक काढुन स्ट्रीट लाइट चे विद्युत बिल संबंधित ग्रामपंचायतींनी १५ वित्त आयोगातुन भरावे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta