कन्हान-पिपरी येथे निषादच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ
कन्हान : – उत्तरप्रदेशात चमत्कार घडविणाऱ्या निर्बल इंडियन शोषित हमारा आमदंगल अर्थात निषाद पार्टी च्या सदस्यता नोंदणीचा शुभारंभ १ जुलै २०२१ रोजी पिपरी-कन्हान येथे करण्यात आला. यावेळी निषादचे संयोजक अँड. दादासाहेब वलथरे, विदर्भ प्रभारी दिलीप मेश्राम, जिल्हा प्रभारी मनोज बावणे, भारत मोहनकर, संदीप शेंडे, निशांत टेम्भेकर, यश मानकर, सुरेश प्रसाद, बालचंद्र बोन्द्रे, मेघा बावणे, माला बावणे आदीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत निवडणुक भविष्यात निषाद पार्टी कडून लढविली जाणार आहे. आम्ही नागपुर मनपा च्या निवडणुकी तही उमेदवार रिंगणात उतरविणार आहोत अशी भुमिका निषादचे संयोजक अँड.दादासाहेब वलथरे यांनी मांडली. उत्तरप्रदेशात निषादने भाजपा शी युती केली. आणि चमत्कार झाला. अगदी असाच प्रयोग महाराष्ट्रात करायचा असल्याचा मानसही त्यांनी बोलुन दाखविला. पारशिवणी तालुक्यातील कन्हान पिपरी गावातुन निषादची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. यावेळी दिलीप मेश्राम व मनोज बावणे यांनी पार्टी च्या ध्येय धोरणा वर प्रकाश टाकला.
प्रत्येक निवडणूक लढणार – अँड. दादासाहेब
महाराष्ट्रात निषाद पार्टीला आपले पाय घट्टपणे रोवायचे आहे. आज आम्ही सदस्य नोंदणी सुरू केली आहे. यापुढे उमेदवारांचा शोध घेतला जाईल. त्या उमेदवारांना निषाद तर्फे प्रत्येक निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तथा आमदार, खासदार निवडणुकीतही उमेदवार उतरविले जातील. तळागाळातील होतकरू कार्य कर्त्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात पाठवुन जनतेची सेवा करण्याचे निषादचे धोरण आहे.