सिंगम सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेने लोखंडी सळाख व पाईप चोरी पकडले

सिंगम सिक्योरिटी गार्डच्या सतर्कतेने लोंखडी सळाख व पाईप चोरी पकडली

#) एकुण १४५२० रूपयाचा मुद्देमाल चोरी प्रकरणी कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल.  


कन्हान : – गोंडेगाव ते भानेगाव कन्वेयर बेल्टचे काम  आय.एस.जी.ई.एल कंपनी करित असुन येथे मोठमोठ या लोंखडी सळाखी, पाईप ची चोरी होत असल्याने सिंगम सिक्युरिटी लावण्यात आल्याने सिंगम सेक्युरि टीचे मुख्य रवि सिंघम, मार्गदर्शक व ट्रेनर चंद्रशेखर अरगुलेवार आणि सुरक्षारक्षक धर्मेंद बावने, टिकाराम छानिकर च्या सतर्कतेने तीनचाकी वाहनात लोंखडी सळाख व पाईप चोरी करून नेताना पकडुन कन्हान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. 

       गोंडेगाव ते भानेगाव घाटरोहना गोंडेगाव परिसरा त कन्वेयर बेल्टचे काम आईएसजीईएल कंपनी करित असुन येथे मोठ मोठया लोंखडी सळाखी, पाईप ची चोरी वाढल्याने सिंगम सिक्युरिटी ला (दि.१७) जुन २०२१ पासुन लावुन सुरक्षा कडक करण्यात आली.  प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.९) जुलै २०२१ ला सकाळी ८ वाजता दरम्यान सिंघम सेक्युरिटीचे सुरक्षा रक्षक धर्मेंद बावने व टीकाराम छानिकर कर्तव्यावर असताना तीनचाकी वाहन क्र. एमएच ४९-डी – ४८७३ चा चालक साहु राह. कळमना रोड शनिमंदीर जवळ यास चारचाकी वाहन घेऊन जाताना थांबवुन पाहिले असता लोंखडी सळाखी, पाईप असल्याने चालक शाहु यास विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की , घाटरोहणा येथुन ३०० किलो लों खड १० हजार रूप यात विकत घेऊन आणले आहे. हा माल कंपनीचा असल्याने सुरक्षारक्षकांनी चंद्रशेखर अरगुलेवार यांनी फोनवर सांगितल्याने चंद्रशेखर अरगुलेवार हयानी फोन करून कन्हान पोलीस स्टेशनचे उप निरिक्षक महादेव सुरजुसे हयांना घटनेची माहीती देताच तातडी ने गोंडेगाव घटनास्थळी पोहचुन टाटाएस चारचाकी वाहन व चालक हयाना ताब्यात घेत कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. कन्हान पोलीसांनी आयएसजीईएल कंपनी चे सुरेशकुमार वैध यांचे फिर्यादी वरून कन्वेयर बेल्ट च्या कामाचे २० वर्टीकल पाईप किंमत ८००० रू, टी एमटी लोंखडी बार १२ (३२ एमएम) किंमत ५७६० रू, टीएमटी लोंखडी बार १० (१६ एमएम) किंमत ४०० रू, लोंखडी शिंकजे ७ किंमत २८० रू, युज्याक २ किंमत ८० रू असा एकुण १४५२० रूपयाचा मुद्दे माल चोरी केल्या प्रकरणी आरोपी विरूध्द अप क्र  २५३/२१ कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोउपनि महादेव सुरजुसे, हेकां जियालाल सहारे, विरेंन्द्र सिंग चौधरी, प्रकाश वर्मा हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

स्कार्पियो गाड़ीत ०३ गोवंश १ गोरा व २ गाय भरु न नेतांना पकडुन जनावरांना दिले जिवनदान

Fri Jul 16 , 2021
स्कार्पियो गाड़ीत ०३ गोवंश १ गोरा व २ गाय भरु न नेतांना पकडुन जनावरांना दिले जिवनदान #) कन्हान पोलीसांची कारवाई २ आरोपी अटक करून एकुण २,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एम.जी नगर येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना एक स्कार्पि यो गाडीत तीन गोवंश १ गोरा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta