* घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन कडेकोर पोलीस बंदोबस्तात
* गणपती विर्सजन शांतात पूर्वक वातावरणात
* नदी पात्रात ढिवर समाज संघटनच्या पथका व्दारे श्री गणेश मुर्ती विसर्जन.
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येतो. परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे सावट असल्याने शहरातील परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करूनच श्री गणेश उत्सव साजरा करून कन्हान-पिपरी नगरपरिषदे द्वारे काली मंदिर कन्हान नदी काठावर श्री गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.
परिसरात शुक्रवार (दि.१०) सप्टेंबर ला श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी बाप्पाची घरो घरी ६१४ व सार्वजनिक शहर ४ आणि ग्रामिण १४ श्री गणेशाची स्थापना केली होती. कोरोना काळातील शासनाच्या नियमाचे पालन करूनच शहरात व परिसरात गणेश उत्सव साजरा करण्यात आले. जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसापासुन सतत पाऊस होत असल्याने कन्हाननदी दुथडी भरुन वाहत असल्याने रविवार (दि.१९ ) व सोमवार (दि.२०) सप्टेंबर ला गणेश विसर्जनाच्या पुर्व नियोजन करण्याकरिता नगरपरिषद व कन्हान पोलीस प्रशासनाने सोमवार (दि.१३) सप्टेंबर ला काली मंदिर नदी काठावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतलेला होता. मंगळवार (दि.१४) सप्टेंबरला कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन आगामी रविवार (दि.१९) व सोमवार (दि.२०) सप्टेंबर दोन दिवस काली मंदिर सत्रापुर कन्हान नदी काठावर नगरपरिषद द्वारे गणेश विसर्जनाकरिता विधृत (लाईटस), कुत्रिम टैंक, ढिवर समाज संघटनाचे पथक व संपुर्ण व्यवस्था करण्यात आल्याने शहर व परिसरातील नारिकांनी घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे काली मंदिर कन्हान नदी काठावर विर्सजन केले. विर्सजन पोलीस निरिक्षक काळे यांनी पोलीस स्टेशन कर्मचारी व नागपूर येथून पथक मागऊन कडेकोट पोलीस बंदोबस्त व नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर यांचा उपस्थित शांतिपूर्ण वातावरणात यावेळेस ढिवर समाज संघटन अध्यक्ष सुतेश मारबते, राजु मारबते, मोहन वाहिले, रेखा भोयर, बंडुजी केवट, धर्मराज खंटाटे, रवि केवट, यांचा मदतीने पार पडले.यावेळेस सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार, डेकोरेशन व्यवस्थापक महादेव लिल्हारे, अजय चव्हान, प्रदीप गायकवाड सह नप अधिकारी व कर्मचारी यांनी अधीक गणपती विर्सजन करण्यात परिश्रम घेतले.