पहील्याच दिवसी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे लोकांची एकच गर्दी
कामठी : दीड वर्षाच्या लॉकडाऊन नंतर लोकांकरिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रवेश सुरु . कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे कोरोना प्रार्दुभावामुळे लोकांकरिता बंद होते . परंतु शासनानी आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ पासुन धार्मीक स्थळे सुरू करण्याचा निर्णय झाल्यामुळे पहील्याच दिवशी लोकांनी एकच गर्दी केली . गेल्या दीड वर्षा पासुन लॉकडाऊनमुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल लोकांकरिता प्रवेश बंद असतांना सुध्दा ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील कर्मचारी नियीमत कामावर येत होते व ड्रॅगन पैलेस टेम्पलची स्वच्छता , रखरखात हे नियीमत सुरू होते . शासनानी दिलेल्या नियमावलीचे पालन करित रोज सकाळी १०.०० वाजता व सायंकाळी ६.०० वाजता नियीमत बुध्द वंदना व जॅपनीस चॅटींग करण्यात येत होती . त्याच प्रमाणे १० एकर जागेवर असलेल्या लॉन व बगिचा नियमित रखरखात करण्यात येत होते . त्यामुळे दीड वर्षा नंतर ही ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे लोकांकरिता नेहमीसारखे सज्ज आहे . ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या मुख्य प्रवेश द्वार येथे प्रवेश करणा – या लोकांकरिता सॅनिटाईजरची व्यवस्था केलेली आहे . तसेच मास्क घालुन येने अनिवार्य केलेले आहे . अशी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी माहिती दिली.