कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी ची नियुक्ती
#) नागरिकांच्या मागणीला यश, मंत्री सुनिल केदार व अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे मानले आभार .
कन्हान : – कन्हान शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्या बाबत सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व सहका-यां नी मंत्री सुनिल केदार व जि प अध्यक्षा सौ. रश्मीताई बर्वे यांना केलेल्या मागणीची दखल घेत या गंभीर विषयाकडे लक्ष केंन्द्रीत करून तात्काळ शहरातील प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे महिला अधिकारीची नियुक्ती केल्याने नागरिकांनी महिला अधिकारी यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि मंत्री सुनिल बाबु केदार व अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे आभार व्यकत केले .
कन्हान-पिपरी शहर हे तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असुन अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारी यांची कित्येक वर्षापासुन स्थायी नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शह रातील व आजुबाजुच्या ग्रामीण भागातील उपचार घेणार्या महिलांना, युवतींना महिला वैद्यकीय अधिका री नसल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करा वा लागत होता. त्यामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारीची नियुक्ती करण्या त यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व सहका-यांनी मंत्री सुनिल केदार व जि. प. अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांना निवेदन देऊन केली होती. या गंभीर विषया ची दखल घेत मंत्री सुनील केदार व जि. प. अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी लक्ष केंद्रीत करून तात्काळ शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे महिला अधिकारीची नियुक्ती केल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार व सहकारी नागरिकांनी महि ला अधिकारी यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असुन नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महिला अधिकारीची नियुक्ती करण्यात आल्याबद्द्ल मंत्री सुनिल बाबु केदार व जि. प. अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांचे आभार व्यकत केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, पंकज गजभिये, दिपक तिवाडे, अशोक मेश्राम, विजय बावनकुळे, कुंदन रामगुंडे, रामु कावळे, अभिषेक आकरे, माधुरी गावंडे, वर्षा रामगुंडे, शालु कावळे, कल्पना खंदारे, उषा ठाकरे, विमल आकरे, मीना पहाडे, रामकली वानखेडे आदी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.