*कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक विकलांग (अपंग) दिवस थाटात साजरा*
कार्यक्रमात प्रमाण पत्र , पुष्प गुच्छ देऊन व नमकीन पैकीट वाटप करुन केला विकलांग बांधवाचा सत्कार
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक विकलांग (अपंग) दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , थोर समाज सुधारक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व विकलांग बांधवांना प्रमाण पत्र , पुष्प गुच्छ देऊन व नमकीन पैकीट वितरण करुन जागतिक विकलांग दिवस थाटात साजरा करण्यात आला .
शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर जागतिक विकलांग (अपंग) दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , प्रमुख अतिथि बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखाताई ठमके , भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान च्या शिक्षिका वर्षा सिंगाडे , कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ
डॉ बाबासाहेब आंबेडकर , थोर समाज सुधारक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विकलांग दिवस निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन करीत लसीकरण करण्याचे आव्हाहन केले असुन मास्क , सेनिटाइजर , व सोशल डिस्टेंस सह शासनाच्या कोरोना काळातील सर्व नियमाचे पालन करण्याचे आव्हाहन केले . या नंतर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी सर्व विकलांग बांधवांना प्रमाण पत्र , पुष्प गुच्छ देऊन , नमकीन पैकीट , व अल्पोहार वितरण करुन जागतिक विकलांग दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके मॅडम , भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान च्या शिक्षिका वर्षा सिंगाडे , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सदस्य हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , सह आदि मंच पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .