*जि.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*
जि.प.उ.प्रा.शाळा को.खदान येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच संपन्न झाली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जि.प.अध्यक्षा मा.सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे ह्या होत्या. विशेष अतिथी म्हणून पारशिवनी पं.स.सभापती सौ.मीनाताई कावळे ,पं.स.सदस्या (टेकाडी सर्कल) कु.करुणाताई भोवते,गटशिक्षणाधिकारी श्री कैलासजी लोखंडे,ग्रामपंचायत सरपंच सौ.मिनाक्षीताई बुधे,जेष्ठ शि.वि.अधिकारी रेखाअगस्ती, शा.व्य.समिती अध्यक्ष सैजाद खान, ग्रा.पं.सदस्या आशाताई राऊत,संध्याताई सिंग, दलजिसिं जम्बे, समाजसेविका अरुणाताई डोंगरे,शिक्षणप्रेमी गजराज देविया हे उपस्थितीत होते. सर्व प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून,सर्व मान्यवर व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन व स्वागत करण्यात आले.
नागपूर जि.प.अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांचे हस्ते शाळेतील शिक्षक व शा.व्य.समितीच्या सहयोगातून शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक श्री. प्रेमचंद राठोड यांच्या संकल्पनेतून वर्ग सातवीतील विद्यार्थी अमित कश्यप व सुमित कश्यप या जुळव्या भावंडांचा जि.प.अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मांडवकर सर यांनी तर,सुञसंचालन श्री प्रेमचंद राठोड यांनी केले. श्री.प्रमोद चांदेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मधुमती नायडू, सौ.रिदवाना शेख, श्री अभिषेक कांडलकर व श्री रंजित सलामे यांनी मोलाचे सहकार्य केले.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.