सावनेर शहरात विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धाचे आयोजन
सावनेर : स्वामी विवेकानंद यांचा १५९ व्या जयंती निमित्त (राष्ट्रीय युवा दिवस) निमित्त विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले होते .
त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये सावनेर,उमरेड,नागपूर,रामटेक, चंद्रपूर,अमरावती,वरूड,यवतमाळ येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी चे हेड कोच व अंतरराष्ट्रीय स्केटर कुणाल रमेश बेले यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.सुमित्रा कुंभारे , माजी उपाध्यक्ष मा.श्री.मनोहरजी कुंभारे, रोलर स्केटिंग असोसिएशन सावनेर चे अध्यक्ष डॉ.रेव्ह.मार्क साखरपेकर सर, व्यापारी संघटनेचे सचिव श्री.मनोजजी बसवार ,रोलर स्केटिंग कोचेस असोसिएशन नागपूर चे संस्थापक.अध्यक्ष. श्री. गजेंद्र बनसोड, सचिव मनीष बैसवारे, कपिल गाडीवान, कामाक्षी सेलिब्रेशनचे संस्थापक श्री.पंकजजी घाटोडे व डाॅ. पराग घाटोडे, नगरसेवक. श्री. लम्क्षीकांत दिवटे , श्री. गोपलजी घटे,श्री.निलेश पटे,श्री. अतुलजी पाटील, तालुका क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक प्रा.श्री.योगेशजी पाटील,श्री. प्रकाशजी बालपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उमरेड चे कोच रवींद्र मिसाळ सर यांनी केले, सदर स्पर्धेचे पंच म्हणून आरस्कॅन चे कोचेस किशोर ढोरे,संदीप सिंग,आदित्य परमार,परेश चव्हाण, रुपल टाले,आकाश सर,दानिश खान पठाण,पियूष शिरपुरकर, उत्कर्षा मॅडम यांनी केले.स्पर्धेला यशस्वी पणे पार पाडण्यामध्ये सौ.मीनाक्षी कुणाल बेले, सप्रेम धोटे,जोशुआ साखरपेकर,सौरभ टेकाडे, अथर्व गावंडे,अमन चव्हाण व तायक्वांडो कोच मनोज बगारे सर यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 1,114