गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान ; संबंधित अधिकाऱ्यांची भुमिकेवर ?

गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान

#) संबधित अधिका-यांनी सात दिवसात योग्य कारवाई करा, अन्यथा कंपनी विरोधात शेतक-यांचे आंदोलन – माजी खासदार प्रकाश जाधव

कन्हान : – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतक-यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आणि ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतक-यांनी वारंवार निवेदन देऊन दखल न घेतल्याने स्थानिय माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयानी  मा. प्रशांत सांगाडे तहसिलदार पारशिवनी व संबधित अधिकारी यांना सांगितले की, कोल वाशरी व परिसरातील शेती आणि गावाची पाहणी, चौकसी करून कंपनी विरोधात योग्य ती कारवाई सात दिवसात करा, अन्यथा ही समस्या शेतक-यांच्या जिवन मरण्याची असल्याने शेतक-यांचे आंदोलन करून कंपनी बंद करू अशा इशारा दिला. 

        गट ग्राम पंचायत घाटरोहणा (एंसबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवार लगत येसंबा जवळ गुप्ता कोल वाशरी महामिनरल प्रायव्हेट लि. कंपनी याच वर्षी सुरू होऊन रोज चार, पाचशे ट्रक कोळसा येणे-जाणे आहे. खदानचा कोळशा आणुन उघडयावर टाकुन पोकलँड व जेसीबी मशीनने कोळशा बारीक करून प्रकिया करित ट्रक मध्ये भरून बाहेर पाठविला जातो. कोल वासरीची कोळशा धुळ उडुन वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव व गोंडेगाव परिसरातील १०० हेक्टर वर शेतातील मोसंबी, कापुस, तुर, गहु, चना, मिरची, वांगे, गोबी सर्वच पिकाचे भंयकर नुकसान झाले आहे. कापुस काढण्यास शेतमजुर येत नाही. मोसंबी, मिरचे बाजारात विकायला नेल्यास कोणी घ्यायला तयार नाही. शेतपिकाचे अतोनात नुकासान शेतक-याला भोगावे लागत आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणा-या धुळीने शरीर, कपडे काळे झाल्याने गावात जायची सुध्दा लाज वाटते. कंपनीतुन कोळसाच्या उडणा-या धुळीमुळे जमिन, विहीर, नाल्याचे पाणी प्रदुषित होऊन गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नाले, विहीरीचे प्रदुषित पाणी नागरिक, जनावरे पित असल्याने शेतकरी, गावक-यांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

  यास्तव शेतक-यांच्या व गावक-याच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणुन गुप्ता कोल वासरी कंपनीच्या कोळशा धुळीमुळे झालेले शेतपिकाचे नुकसान शेतक-यांना त्वरित कंपनी मालकाने दयावे. तसेच गावापासुन दुर दुसरी कडे जिथे कुणाचे नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी स्थानातरित करण्यात यावी. अश्या न्यायीक मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात मा. प्रशांत सांगाडे, तहसिलदार पारशिवनी, मा. महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी, मा. वाघ, मंडळ कृषी अधिकारी हयाना देऊन शेतक-यांच्या समस्येवर गांभिर्याने लक्ष केंद्रीत करून गुप्ता कोल वाशरी कोळशा धुळी च्या प्रदुर्शनाची तपासणी व परिसराची पाहणी करून शेतक-यांची झालेली नुकसान भरपाई कंपनी कडुन मिळवुन द्यावी. कोळसा धुळी पासुन मुक्त करण्यास सात दिवसात कार्यवाही करून योग्य न्याय द्यावा. अन्यथा समस्त शेतकरी, गावकरी कंपनी विरोधात जन आंदोलन करून कंपनी बंद करतील. त्यावेळेस उदभवणा-या प्रकारास कंपनी मालक व संबधित प्रशासन अधिकारी जवाबदार राहतील. अशा ईशारा देण्यात आला.

  याप्रसंगी रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, कमलसिह यादव, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, प्रकल्पग्रस्त शेतकरी तेजराम खिळेकर, धनराज घोडमारे, दिलीप ठाकरे, कृष्णाजी खिळेकर, आंनदराव गुरांदे, मारोतराव लसुंते, हिरालाल खिळेकर, युवराज नाकतोडे, राजु बोबडे, सुधाकर खिळेकर, धनराज पांडे, संदीप ठाकरे, अतुल चरडे, राजेश खिळेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

टेकाडी शिवारात एका इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या

Sat Jan 15 , 2022
टेकाडी शिवारात एका इसमाने गळफास लावुन केली आत्महत्या कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात शेतातील झाडाला दुपट्याने गळफास लावुन रविंद्र पोटभरे इसमाने आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.   प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.१२) जानेवारी २०२२ ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान मृतक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta