- कन्हान परिसरात मास्क न घालण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु
#) १३५ विनामास्क १४ हजार ३०० रुपयाचा दंड वसुल, कन्हान नगरपरिषद, पोलीसांची कारवाई.
कन्हान : – राज्यात पुन्हा कोरोना व ओमिक्राॅन चे रुग्ण झपाट्याने दिवसे दिवस वाढत असल्याने शासना ने नवीन नियमावली लागु करून पोलीस विभाग व संबंधित अधिका-यांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यां वर दंडात्मक कारवाईचे आदेश दिल्याने कन्हान परिसरात नगरपरिषद व पोलीस स्टेशन कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणार्यां १३५ नागरि कांवर १४ हजार ३०० रुपयाचा दंड वसुल करित कारवाई करून शासनाच्या कोरोना प्रतिबंधत्माक सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे कडकडीचे आवाहन केले आहे.
देशात, राज्यात, जिल्हा, तालुक्यात व कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने दिवसे-दिवस वाढत असुन शासनाने नवीन नियमावली लागु करून पोलीस विभाग व संबंधित अधिका-यांना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई चे आदेश दिल्याने कन्हान परिसरात पोलीस विभाग व नगर परिषद प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.
शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसे दिवस वाढत असुन।सुद्धा नागरिका द्वारे मास्क व सोशल डिस्टेंगिंचे पालन करीत नसल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे वाहतुक कर्मचारी व कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा चौक, गहुहिवरा चौक येथे बुध वार (दि.५) जानेवरी पासुन प्रत्येकी १०० रु. दंड आकारण्यात आला असुन आता पर्यंत अंदाजे १३५ नागरिका विरोधात दंडात्मक कारवाई करीत १४ हजार ३०० रूपयाचा दंड वसुल करण्यात आला.पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटे च्या वेळेस सोशल डिस्टेसिंग व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनवर एकुण ४,७५,५ ०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला होता. कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस व कन्हान-पिपरी नगरपरिष द कोव्हिड-१९ विभागाचे प्रमुख संकेत तालेवार यांचे संयुक्त मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे, वाहतुक पोलीस राजेश गौतम, सतिश तांदले, मुकेश जैस्वाल, पोलीस मित्र शुभम बावनकर आणि कन्हान-पिपरी नगरपरिषद चे राजेश राणा, रवि वासे, नेहाल बढेल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली असुन ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याने नागरिकांनी कोरोना व ओमिक्राॅन पासुन वाचण्याकरिता मास्क, सेनिटाइजर, सोशल डिस्टेंसिंग या शासनाच्या कोरोना काळातील सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करावे असे कडकडीचे आवाहन कन्हान पोलीस व कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासना व्दारे नागरिकांना केले आहे.