घाटरोहणा येथे पहाटे बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळी ठार तर एक शेळी गंभीर जख्मी.
कन्हान : – पारशिवनी तालुकातील मौजा घाटरोंहणा गाव शिवारात चिंचा च्या झाड़ा खाली बाधलेली १० ते १२ शेळ्या पैकी बिबटयाने हल्ला करून दोन शेळी ला ठार केले तर एक शेळीला गंभीर जख्मी केल्याने ही परिसरातील ७ वी घटना झाल्याने पेंच व कन्हान नदी काठावरील घाटरोहणा, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी, टेकाडी, वराडा, एसंबा, वाघोली नांदगाव, बखारी, गोंडे गाव कोळसा खदान व जवळ पासच्या परिसरात पुनः श्च भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेच व्याघ्र प्रकल्पाच्या रामटेक वन परिक्षेत्र अंत र्गत पटगोवारी रेंज मधिल घाटरोहणा येथील शेतकरी शेळी मालक श्री दिलीप केशरीचंद चवेले यांचे मालकी च्या गाव शिवारात १० ते १२ शेळ्या आपल्या जवळी ल चिंचाचे झाडाखाली बुधवारी (दि.२६) ला रात्री शेळ या बाधुन आपल्या घरी जाऊन झोपले असता रात्री २ वाजता जोर जोराने शेळया ओरडण्याचा आवाज येकु आल्याने दिलीप चवेले झोपेतुन उठुन जागे होऊन टार्च ने पाहणी केली असता शेळीला बिबटयाने पकडु न ठेवले असेल ओरडाओरड करून आजुबाजुच्या लोकांना जागे केले. तेव्हा बिबटयाने शेळ्या जख्मी करून निघुन गेला. नंतर काही वेळाने पहाटेला पुन्हा येऊन दोन शेळया ला ठार केल्या तर एका शेळी ला गंभीर जख्मी केले. घटनेची माहीती पिडित शेतकरी शेळी मालक दिलीप चवेले यांनी गावच्या नागरिकांच्या मदतीने वनविभाग पटगोवारीचे वनरक्षक श्री एस जी टेकाम ना भ्रमणध्वनीने दिली. तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती आपले वरिष्ठ अधिका री वन क्षेत्र सहायक अशोक द्विग्रेसे साहेबाना देऊन वरिष्ठाचे आदेशाने वनकर्मी ला सोबत घेऊन पोहचुन घटना स्थळाचे निरिक्षण करून पंच १) ज्ञानेश्वर काशी नाथ खंडाते राह. बखारी २) घनश्याम सोमाजी इळपा ची राह. मनसर रामटेक यांचे साहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागाचे श्रेत्र सहायक अधिकारी ए सी दिग्रेस याना दिला. गावकरी नागीरक व पिडित शेतक री पशु मालक दिलीप चवेले यांनी दोन शेळी ला ठार करून एका शेळीस गाभीर जख्मी करून नुकसान केल्याने गावातील नागरिक व पिडीत शेतकरी यांनी वनरक्षक श्रीकांत टेकाम याचेशी चर्चा करून मृतशेळी चा मुआवजा म्हणुन १५ हजार रूपये भरपाई आणि जख्मी शेळीच्या औषध उपचारा करीता लागणा-या खर्चाची आर्थिक मदत सहाय्यता त्वरित मिळवुन दयावी अशी मागणी केली आहे.